National Handloom Day 2023: हातमागावर विणलेल्या आकर्षक कहाण्या

गोव्यातील ‘भाविया हॅण्डलूम’ने ग्लोबल टू लोकल, द गोवन सुपरमार्केट आणि ‘शी-शायन्स वूमन एम्पॉवरमेंट ग्रुप’ यांच्या सहकार्याने महिलांना एकत्र आणून एका खास कार्यक्रमाचे आयोजन केल्रे.
Handloom Day
Handloom DayDainik Gomantak
Published on
Updated on

National Handloom Day 2023 भारतीय हातमाग उद्योगाला ऐतिहासिक परंपरा आहे. परवा 7 जुलै रोजी भारतात हातमाग दिन साजरा झाला. या दिनाचा भाग म्हणून गोव्यातील ‘भाविया हॅण्डलूम’ने ग्लोबल टू लोकल, द गोवन सुपरमार्केट आणि ‘शी-शायन्स वूमन एम्पॉवरमेंट ग्रुप’ यांच्या सहकार्याने महिलांना एकत्र आणून एका खास कार्यक्रमाचे आयोजन केल्रे.

देशातील विविध प्रदेशांमधल्या हातमागावर विणलेल्या विविध शैलींच्या साड्या परिधान केलेल्या या महिला, हातमागाच्या पुरातन कथांच्या जणू प्रवक्त्या बनल्या होत्या.

काश्‍मिरी हातमाग, ओडिशा आदिवासी विणकाम, बेगमपूरी, बंगाल लिनन, केरळ कासवू, कांजिवरम, गोव्याची स्वतःची कुणबी अशा अनेक प्रकारच्या साड्यांनी संबंधीत राज्यांच्या अनोख्या वस्त्र परंपरेला या कार्यक्रमात आकर्षकपणे प्रदर्शित केले गेले.

ग्लोबल टू लोकलच्या अाशा आरोंदेकर यांच्या मते हा उपक्रम म्हणजे या विलक्षण कलेच्या पारंपरिक विणकरांसाठी एक कृतज्ञता सोहळा होता. आम्हा भारतीयांची ओळख सांगणाऱ्या या समृद्ध परंपरांना लोकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन तिने याप्रसंगी केले.

Handloom Day
Goa: हरियाणाच्या उद्योगपतीकडून केअरटेकरवर बलात्कार, ब्रिटीश व्यक्तीच्या मालकीचा गोव्यातील व्हिलाही विक्रीचा केला प्लॅन

गोव्याच्या नामवंत फॅशन डिझायनर रहिला खान यांनीही हातमाग विणकामाचे महत्व आणि वैशिष्ट्य या प्रसंगी विशद केले. हातमागावरील विणकाम कसे ओळखावे यावर तिने यावेळी प्रकाश टाकला. भावियाच्या गौरी जोशी यांच्या मते, ‘हॅण्डलूम एक अनन्य भावनिक मूल्य आपल्यामध्ये रुजवते. ही एक अशी परंपरा आहे जी पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे आवश्‍यक आहे.’

Handloom Day
Goa Congress: कळंगुट बनलेय अवैध धंद्यांचे केंद्रस्थान, सरकार मात्र स्तब्ध

या उपक्रमात हातमागावर विणलेली वस्त्रे पारंपरिक तसेच पाश्‍चात्य फ्युजन अशा विविध शैलीमध्ये प्रदर्शित होत होती. या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात, मळा येथील, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध वारसा सांगणाऱ्या रंगीत गल्ल्यांमधून झालेल्या भ्रमंतीचे, रील आणि छायाचित्रांच्या स्वरूपात दस्तऐवजीकरण करून या संमेलनाची सुंदर इतिश्री झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com