Development of Goa: म्हाका नाका गो!

Development of Goa: गोव्याला प्रशस्त रस्ते नकोत. पूल नको. विमानतळ नको. रेल्वे नको. बंदरे नकोत. मरिना नको. खाणी नको. औद्योगिक प्रकल्प नकोत. गोव्याला केंद्रीय विद्यापीठ नको. एवढेच काय ‘आयआयटी’सारखी नामवंत शैक्षणिक संस्थाही नको.
Development of Goa
Development of GoaDainik Gomantak
Published on
Updated on

दत्ता दामोदर नायक

Development of Goa: म्हाका नाका गो, म्हाका नाका गो’ या गंडाने गोव्याला पछाडलेले आहे. गोव्याला प्रशस्त रस्ते नकोत. पूल नको. विमानतळ नको. रेल्वे नको. बंदरे नकोत. मरिना नको. खाणी नको. औद्योगिक प्रकल्प नकोत. गोव्याला केंद्रीय विद्यापीठ नको. एवढेच काय ‘आयआयटी’सारखी नामवंत शैक्षणिक संस्थाही नको. ‘म्हाका नाका गो, म्हाका नाका गो’ ह्या एकेकाळच्या लोकगीताला गोव्याने गोमंतगीताचा दर्जा दिला आहे की काय कोण जाणे!

Development of Goa
Land Issue: भू-भुक्षित

Gastroesophageal reflux disease(Gerd) हा रोग होतो तेव्हा रोग्याला कोणताही खाद्यपदार्थ नकोसा होतो. खाद्यपदार्थ पाहताच त्याला उलट्या येतात. गोव्याला आपल्या विकासाच्या संदर्भात असाच Gerd रोग झालेला असावा. Not in my backyard(NIMB) म्हणजे माझ्या घरा शेजारी काहीच नको म्हणणारी वृत्ती आता Build absolutely nothing anywhere near anything(BANANA) म्हणजेच कुठेच काही बांधू नको इथपर्यंत पोचली आहे.

आपल्याला काय काय नको याची साद्यंत नामावली करून हा जाहीरनामा आपण प्रसिद्ध करायला हवा. म्हणजे उगीच प्रकल्पांच्या घोषणा नकोत. त्यावरून होणारे वादविवाद नकोत. प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याच्या वल्गना नकोत. पण, ज्यांना काय नको ते पुरेपूर कळते त्यांना काय हवे त्याचेही भान असले पाहिजे. विशिष्ट प्रकल्प नको तर त्याला पर्याय सुचवला पाहिजे. विशिष्ट जागी प्रकल्प नकोत तर पर्यायी जागा सुचवली पाहिजे.

कल्पना करा, आजचे पर्यावरणप्रेमी किंवा कठोर शब्द वापरायचे तर पर्यावरण मूलतत्त्ववादी (Eco Fundamentalist) पूर्वीही असते तर वास्कोहून कॅसलरॉकपर्यंत तिन्हई घाटातून जाणारा रेल्वेमार्ग बांधणे शक्य झाले नसते. पणजीहून पानवेलपर्यंत जाणारा तीन किलोमीटर लांबीचा पूल बांधता आला नसता.

Development of Goa
karma: कर्माच्या बंधनातून सुटावे तरी कसे?

अनमोड घाटातून बेळगावीपर्यंत जाणारा रस्ता करता आला नसता. बोगदे बांधता आले नसते. साळावली धरण बांधता आले नसते. मुरगाव बंदर विकसित करता आले नसते. ‘झुआरी’, ‘सिबा’, ‘एमआरएफ’सारखे प्रकल्प आले नसते. औद्योगिक वसाहतींना विरोध झाला असता. माडाच्या उंचीवर जाणाऱ्या बहुमजली इमारतींना परवानगी मिळाली नसती. ट्रॉलर्सवर बंदी आली असती. ट्रॅक्टरवर बंदी आली असती. घोड्याची कार्रेर जाऊन मोटारगाड्या आल्या नसत्या.

आज पर्यावरणवाद्यांसह सर्वजण विकासाची फळे सोयीस्करपणे चाखत आहेत. दृष्टीआड होणारा विकास (किंवा विकासाच्या नावाने चालणारा विध्वंस) आपल्याला चालतो. त्यामुळे कर्नाटकपुत्र माझे मित्र क्लॉड आल्वारीस कर्नाटकातल्या खाणींबद्दल अवाक्षरही काढत नाहीत किंवा गोवा फाऊंडेशनची कर्नाटक शाखा उघडत नाहीत. माझे दुसरे मित्र, अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले रमेश गावस यांना काणकोणात ‘आयआयटी’ नको, सांगेत नको.

कदाचित ‘आयआयटी’ सिंधुदुर्ग किंवा उत्तर कन्नडा तालुक्यात आल्यास त्यांचा विरोध असणार नाही. गोव्याला विकासाचा मेनोपॉज झाला आहे. सकारात्मक विचार करणारे विचारक दुर्मीळ होत आहेत. नकारात्मक दृष्टी बहिर्गोल भिंगे लावून हिंडते आहे. सृजनशीलतेला ओहोटी आली आहे. प्रतिक्रियावादी (Reactionalist) मानसिकतेला जोरगत आली आहे.

गोव्यातील कॅथॉलिक चर्चचा सर्व पर्यावरणवादी चळवळींना सक्रिय पाठिंबा असतो. युरोपमध्ये लोक चर्चपासून दूर चालले आहेत. जर्मनी, फ्रान्समध्ये चर्चेस ओस पडलेली आहेत. त्यामुळे लोकांना आकर्षित करण्यासाठी चर्चने काही काळापूर्वी कामगार चळवळीसारख्या ‘निधर्मी’ चळवळीत लक्ष घातले. आता कामगार चळवळी थंडावल्यानंतर कॅथोलिक चर्चला पर्यावरणप्रेमाचे भरते आले आहे.

सुदैवाने हिंदुत्ववाद्यांचे पर्यावरणाशी काहीच देणेघेणे नाही. कारण हिंदुत्व हाच मुळी हिंदू धर्माच्या हरीत वृक्षाचा विद्रुप बॉन्साय आहे. ज्यांना आपल्या अनुयायाचे बॉन्साय बनवायचे आहेत त्यांना रानावनांची, झाडापेडांची क्षिती बाळगायचे कारण नाही. इस्लाम देखील ना पर्यावरणाविषयी बोलतो ना विकासाविषयी. कारण इस्लामचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. गरिबांना दैनंदिन जीवनातून तोंड वर काढायला फुरसत नाही. श्रीमंत चैनीत आकंठ बुडून गेले आहेत. पर्यावरणवाद हा सुखवस्तू मध्यमवर्गीयांचे चोचले पुरवतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख विसरलेले (Identity crisis) हे मध्यमवर्गीय पर्यावरणाच्या झेंड्याखाली एकत्र जमले आहेत.

‘हांव सायबा पलतडी वयतां, दामुल्या लग्नाक वयतां, म्हाका सायबा वाट कळना, म्हाका सायबा वाट दाखय.’ म्हणणारे लोकगीत गोव्याला पलतडी पोचू देणार नाही. पलतड गाठणाऱ्या होड्यांचे दोर आधीच कापलेले आहेत. पलतडी जाण्यासाठी पूल कुणालाही नको आहे. गोवा पलतडी पोचणार नाही. गोवा आलतडीच राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com