Kanda Bhaji in Monsoon: पाऊस, गारवा आणि कढईत रटरटणारी कांदाभजी

सांतईनेजला गाडगीळ ज्वेलर्सच्या बाजूला असलेला उदय शिरोडकर यांचा भज्यांचा गाडा या दिवसात संध्याकाळी अनेकांसाठी हॉटस्पॉट बनलेला असतो.
Kanda Bhaji Stall
Kanda Bhaji Stall Dainik Gomantak
Published on
Updated on

Kanda Bhaji in Monsoon छान पाऊस बरसतो आहे. गारवा अंगाभोवती वेल्हाळून पसरलेला आहे आणि अचानक समोरून कुठून तरी तो वास नाकात शिरतो. त्या वासाने चाल स्तब्ध होतेच पण इतर इंद्रियेही ठप्प होतात.

रस्त्याच्या कडेवरच्या गाड्यावर कढईत रटरटणाऱ्या भज्यांच्या गंधाने केव्हाच मनाचा ताबा घेतलेला असतो. त्या गाड्याच्या दिशेने वळण्याखेरीज आता दुसरा उपाय नसतो.

भजी दुसऱ्या ऋतूत मिळत नाहीत काय? अर्थात मिळतात. दिवस मऊ होत जाताना भज्यांना ‘नको’ म्हणणाऱ्या माणसाचा अरसिकपणा दुसऱ्या प्रमाणात खरेतर मोजूच नये. पण पावसाळ्यात होणारा भज्यांचा मोह हा कुंडलीनी चक्र जागे झाल्याप्रमाणे स्वतःच उद्‍भवलेला असतो.

यावेळी कुणी आग्रह करतो आहे म्हणून भज्यांच्या गाड्याच्या दिशेने पावले वळलेली नसतात तर आपला गंध मस्त फैलावून भज्यांनी स्वतःहून दिलेल्या निमंत्रणाला तो प्रतिसाद असतो.

Kanda Bhaji Stall
Freedom: जराशीच उघडीप...

भज्यांची लोकप्रियता इतकी आहे की त्या लोकप्रियतेच्या आडून अनेक प्रकारच्या भजींनी बाजारात (की कढईत?) प्रवेश मिळवला आहे. ओव्याच्या पानांची भजी, बटाटा काप भजी, पनीर भजी इत्यादी.

पण मूळ कांदाभजीच्या जवळपास पोहोचेल असं यापैकी एकाचेही कर्तृत्व नाही. पावसाळ्यात आपल्या साऱ्या जिव्हा-आस्वादांना जर वर्षरूढीप्रमाणे तर्पण द्यायचे असेल तर कांदाभजीला दुसरा पर्याय नाहीच.

Kanda Bhaji Stall
Agritourism: शाश्‍वत शेती आणि पर्यटन

सांतईनेजला गाडगीळ ज्वेलर्सच्या डाव्या बाजूला असलेला उदय शिरोडकर यांचा भज्यांचा गाडा या दिवसात संध्याकाळी अनेकांसाठी हॉटस्पॉट बनलेला असतो.

संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ब्रह्मकमळ उमलून यावे तसे तिथे भज्यांच्या गंधाची कळी उमलून येते आणि आजूबाजूची नाकं उद्दीपित करत दूरवर जाते.

त्यावेळी जर तिथे पाऊस ऐनभरात असला तर गाड्याभोवती उभारलेल्या आडोशाखाली जात-धर्म यापलीकडे जाऊन एकात्मतेने जमलेली गर्दी, गौरवाने कढईत फुलून येणाऱ्या भज्यांनी आपल्या कर्तृत्वानेच गोळा केलेली असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com