Agritourism: शाश्‍वत शेती आणि पर्यटन

‘सध्याच्या परिस्थितीत भात उत्पादनाचे प्रमाण कमी आहे त्याचमुळे भात शेती आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरतेय.
Agritourism
AgritourismDainik Gomantak
Published on
Updated on

फ्रँकी ग्रासियस

आम्हा सर्वांना ठाऊक आहे अन्न कुठून येते. ते मातीत पिकतं. म्हणून अन्न पिकवण्याच्या सेंद्रिय पद्धतीच मातीच्या गुणवत्तेला आधार देऊ शकतात. ‘मातीपासून नेहमीच रसायने दूर ठेवा’ शेतकरी बनलेल्या इंजिनियर नेस्टर रेंजलचे हे म्हणणे आहे.

डोंगुर्ली- वाळपई येथे आपल्या फार्ममध्ये विविध पिके घेत असताना नेस्टर विद्यार्थ्यांना शेतीविषयक धडेही देत असतो. त्याच्या फार्ममध्ये विद्यार्थ्यांचे टूर चालूच असतात.

आज जेव्हा गोवा सरकार राज्याच्या अंतर्भागात पर्यटन जाळे पसरवण्याच्या तयारीत आहे तेव्हा पर्यावरणाची गुणवत्ता राखून शाश्‍वत पर्यटनाचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. राज्याच्या अंतर्भागाचे सौंदर्य त्यांच्या नैसर्गिकतेत आहे.

ही नैसर्गिकता हरवून जाऊ नये यासाठी प्रयत्न करणारे जे लोक आहेत त्यात नेस्टरचा समावेश होतो. त्याच्या फार्ममध्ये होणारी शेती नैसर्गिक साधनांच्या सहाय्यानेच होते. ‘मी स्वतः भरपूर प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती करतो त्यामुळे मातीच्या समृद्धतेत भर पडते.

माझ्याकडे असलेल्या कंपोस्ट युनिटमध्ये दर महिन्याला ३०००० ते ५०००० किलोग्रॅम गांडुळखत, शेणखत तसेच कोकोपिट (नारळाच्या काथ्या, भुसा यापासून बनवलेले) तयार होते’

Agritourism
Deep Sea Bioluminescence: जीवदीप्ती कवकाच्या वैभवाचे दर्शन

नेस्टरला वाटते की गोव्याची जमीन रिअल-इस्टेट माफियाच्या घशात जाण्यापासून वाचवण्यासाठी शेतीत वाढ होणे आवश्‍यक आहे. आपल्या लोकसंख्येसाठी पुरेल इतके धान्य उत्पादन करण्याची क्षमता गोव्याकडे आहे हा विश्‍वास नेस्टरला आहे.

‘सध्याच्या परिस्थितीत भात उत्पादनाचे प्रमाण कमी आहे तसेच त्यापासून मिळणारा फायदाही मर्यादित आहे. त्याचमुळे भात शेती आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरते आहे. सामुदायिक शेती किंवा करार पद्धतीची शेती (ज्यामध्ये जमीन मालकांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतलेली असते) ही काळाची गरज आहे.’

नेस्टर स्वतः गोव्यातील वेगवेगळ्या गावात सामुदायिक शेतीचा उपक्रम चालवतो. दर महिन्याला सरासरी ५००० किलो लाल तांदूळ त्याद्वारे विकला जातो.

Agritourism
Freedom: जराशीच उघडीप...

नेस्टरने गेली अनेक वर्षे स्वतःला वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमध्ये झोकून दिले आहे. आपल्या फार्ममध्ये त्याने गायी, शेळ्या व कोंबड्या पाळल्या आहेत. भात, अळसांदे, नाचणी, मका याचे पीक तो आपल्या शेतात घेतो.

२५ एकरमध्ये पसरून असलेल्या त्याच्या काजूच्या बागेत तो फेणी गाळतो तसेच लाकडाच्या आगीवर भाजणाऱ्या काजू बियांचे उत्पादन मिळवतो. त्याच्या फार्ममध्ये ७० वेगवेगळ्या जातींच्या आंब्याची झाडे आहेत. तिथल्या नर्सरीत तो आंब्यांची रोपाची कलमे तयार करतो.

पावसाळा सरला की ‘हायड्रोपॉनिक्स’ पद्धतीतून विदेशी भाज्यांचे तो उत्पन्न घेतो. नेस्टरचे म्हणणे आहे, ‘महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या तुलनेने गोव्याला कृषिप्रधान राज्य म्हणता येणार नाही.

गोव्यात शेतीविषयक चांगल्या योजना आहेत पण त्या संबधित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खात्याकडून प्रयत्न व्हायला हवेत. तोपर्यंत आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला इतर राज्यांवरच अवलंबून रहावे लागेल.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com