Kunbi Saree Post Stamp
डॉ. एम.आर. रमेशकुमार
गोव्यातील पुरातन कुणबी जमातीत िस्त्रया परिधान करीत असलेले कुणबी साडी हे वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र होते. ही जमात शेतात श्रम करणाऱ्यांपैकी असल्याने या साडीची रुंदी कमी असायची जेणेकरुन शेतात काम करताना त्यांना साडीचा अडथळा होत नसे.
मात्र काळ बदलत गेला तसा साडीचा वापर लक्षणीयरित्या कमी होत गेला. हातमागावर विणली जाणारी ही कुणबी साडी, आदिवासी जमातींच्या संस्कृतीची स्मरण करणारी एक खूण अशा अस्पष्ट स्वरुपातच आता टिकून आहे.
सांस्कृतिक महत्व असूनदेखील कुणबी साडीच्या बाबतीत असलेली परिस्थिती थोडीशी उपरोधिकच आहे. गोव्यात आज विणकर जमात किंवा हातमाग शिल्लक नाहीत, जिथे कुणबी साड्या विणल्या जातात आणि त्यामुळे विणकामाचे हे पारंपरिक ज्ञान जवळजवळ लुप्त झालेले दिसते.
अधिक गंभीर बाब म्हणजे लाल चौकडीच्या साड्यांची उत्पत्ती कशी झाली यावरही कोणतेच दस्तएेवज उपलब्ध नाहीत.
आज अनेक व्यक्ती तसेच संस्थांकडून या साडीच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे ही साडी इतिहासाच्या पानांमध्ये कायमची हरवून जाणार नाही अशी अाशा उत्पन्न झाली आहे.
२०१५ साली राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होण्यास सुरू झाल्यापासून भारतीय टपाल खात्याने देशातील अनेक विशेष हातमाग वस्त्रांना आपल्या टपाल साहित्यावर स्थान देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
भारतातील अनेक प्रदेशातील आदिवासी जमातींकडून तसेच हातमागावरून तयार होणाऱ्या वस्त्रांच्या बहुमानाप्रित्यर्थ भारतीय टपाल खात्याने फर्स्ट डे, लिफाफे, विशेष लिफाफे, स्टॅम्प्स जारी केले आहेत. प्रत्येक राज्यांना त्या राज्यातील जमाती तसेच हातमागासाठी विशेष कव्हर निर्माण करण्याचा अधिकार आहे.
आज, हातमाग दिनानिमित्त महाराष्ट्र आणि गोवा टपाल विभाग विशेष रद्दीकरण ठसा जारी करणार आहे. रद्दीकरण ठशाऐवजी त्यांनी जर कुणबी साडीचे चित्र असलेला एखादा विशेष लिफाफा जारी केला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरले असते असे गोवा फिलेंटली ॲण्ड न्युमिस्मॅटिक सोसायटीचा सदस्य या नात्याने मला वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.