National Handloom Day 2023: उत्कृष्ठ रचनांमधून विणकाम तंत्राचा वारसा - भारतीय हातमाग उद्योग

हातमाग उद्योगाप्रती कृतज्ञता प्रकट करण्याच्या उद्देशाने मळा-पणजी येथील ‘ग्लोबल टू लोकल’मध्ये सायंकाळी ४.3० वाजता 'विवर्स ऑन दि रॅम्प' कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे.
National Handloom Day
National Handloom DayDainik Gomantak
Published on
Updated on

National Handloom Day भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत स्वदेशी चळवळीला खूप महत्व होते. 1905 या वर्षी स्वदेशी चळवळीचा नारा भारतात दिला गेला आणि परदेशी कपड्यांची होळी स्वदेशप्रेमींकडून झाली. या चवळवळीमुळे देशी उद्योगांना आणि स्वदेशी चेतनांना बळ मिळाले.

या उत्थानात हातमाग विणकरांचाही समावेश होता. 7 ऑगस्ट 2015 पासून भारत सरकारने राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे. आज आपण 9 वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करत आहोत.

National Handloom Day
Gomantak Editorial: धोक्‍याचा घंटानाद

जागतिक स्तरावर सर्वात अधिक हातमाग विणकर भारतात आहेत. त्यांची संख्या सुमारे ४३ लाख इतकी आहे. एकूण विणकरांच्या ७० टक्के स्त्रिया आहेत. भारतीय हातमाग उद्योग, पारंपारिक आणि भावी पिढीसाठी बनणाऱ्या उत्कृष्ठ रचनांमधून विणकाम तंत्राचा वारसा जपतो. नैसर्गिक तंतू आणि रंग वापरून हातमाग उत्पादने बनवली जातात, जी पर्यावरणास अनुकूल आणि टिकाऊ असतात.

National Handloom Day
Goa Government Solid Waste Policy: नव्या धोरणाबाबत सरकार खरोखरच गंभीर आहे?

हातमाग उद्यागास आपल्याला मदत कशी करता येईल ?

  • हातमाावर विणलेल्या वस्तू खरेदी करुन या उद्योगाला आणि त्यावर अवलंबून असलेल्या कारागिराला आपण मदत करू शकता.

  • इतर कपड्यांबरोबर हातमागावर विणलेले कपडे देखील अवश्‍य वापरा. ही कृती हातमाग विणकामाला चालना देऊ शकेल.

  • हातमागावर विणलेल्या वस्त्र प्रदर्शनास अवश्‍य भेट द्या. त्या वस्त्रांची आकर्षकता आणि वैविध्य आपल्या लक्षात येईल.

  • हातमाग केंद्राला भेट द्या. त्यातून हातमाग उत्पादनांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या लोकांबद्दल, त्या उद्योगाबद्दल आणि त्यांच्या नेटवर्कबद्दल आपल्याला जाणून घेता येईल.

  • शिक्षक विद्यार्थ्यांना हातमाग विणकमाबद्दल माहिती गोळा करण्याास सांगू शकतो. या विद्यार्थ्यांनी कारागीर, त्यांची काम करतानाची छायाचित्रे शेअर केल्यास विणकरांच्या कहाण्या दूरवर पोहचू शकतात.

National Handloom Day
Gianni Arts Gallery 2003: द पॉवर बायनरीमध्ये मोहन नाईक

हातमाग दिनाच्या निमित्ताने गोव्यात...

आजच्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त भाविया (भारतीय विणकर आणि यार्न) या गोवा स्थित आस्थापनाने 'विवर्स ऑन दि रॅम्प'चे पणजीत आयोजन केले आहे. अभिनव अशा या कार्यक्रमात हातमागावर विणल्या गेलेल्या साड्या नेसून स्त्रिया एकत्र येतील.

हातमाग उद्योगाप्रती कृतज्ञता प्रकट करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मळा-पणजी येथील ‘ग्लोबल टू लोकल’मध्ये सायंकाळी ४.3० वाजता या कार्यक्रमास सुरुवात होईल.

हा कार्यक्रम म्हणजे कािश्‍मर ते कन्याकुमारीपर्यंत असलेल्या विविध भागातील हातमागावर विणलेल्या साड्या (पारंपारिक कॉटन सिल्क किंवा प्युअर सिल्क) नेसून एकत्र आलेल्या स्त्रियांचा मेळावा असेल. या कार्यक्रमासाठी नोंदणी करतानाच आपण कुठल्या प्रकारची हातमाग साडी नेसणार आहे हे नमूद करणे आवश्‍यक होते.

एकाच प्रकारच्या साड्या दोन महिलांनी नेसू नये हा त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे या मेळाव्यात सामील झालेल्या स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसून असतील. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या स्त्रियांच्या संख्येची नोंदणी पूर्ण झाली आहे.

राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने हातमागावर विणलेल्या, विविध प्रकारच्या साड्या नेसून आलेल्या स्त्रियांचा हा मेळावा आकर्षक ठरेल यात शंका नाही. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com