Gianni Arts Gallery 2003: द पॉवर बायनरीमध्ये मोहन नाईक

‘द पॉवर बायनरी’ बंगळूर येथील ‘चित्र कला परिषद’ भवनात ९ ऑगस्ट पासून सुरु होत आहे.
Mohan Naik
Mohan Naik Dainik Gomantak

Gianni Arts Gallery 2003 ग्यानी आर्टस गॅलरी २००३ मध्ये सिंगापूर येथे स्थापन झाली. समकालीन दक्षिण भारतीय शैलीत काम करणाऱ्या राष्‍ट्रीय असेच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दिग्गज कलाकारांच्या कलाकृतींचा संग्रह तसेच त्या क्षेत्रात संशोधन करणे या हेतूने ही गॅलरी सिंगापूरस्थित पी. ग्यान या दक्षिण भारतीयांमार्फत स्थापन झाली होती. 

सिंगापूर स्थित ‘ग्यानी आर्टस’ ने आयोजित केलेले ऐतिहासिक म्हणावे असे कला प्रदर्शन, ‘द पॉवर बायनरी’ बंगळूर येथील ‘चित्र कला परिषद’ भवनात ९ ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या प्रदर्शनात भारत आणि सिंगापूर येथील मिळून १०० पेक्षा अधिक कलाकारांच्या कलाकृती मांडल्या जाणार आहेत.

Mohan Naik
"दिवसाला दोन-दोन हजार किलोमीटर रस्ते बांधणारे, Goa-Mumbai Highway अजून पूर्ण करू शकले नाहीत"

भारतातील इतर प्रसिद्ध चित्रकारांचा समावेश असलेल्या या प्रदर्शनात गोव्याचे नामवंत चित्रकार मोहन नाईक यांच्या दोन चित्रकृती मांडल्या जाणार आहेत.

ग्यानी आर्टसच्या सह-संस्थापिका विद्या नायर या प्रदर्शनाबद्दल म्हणतात, ‘आधुनिक आणि समकालीन कलेच्या सामान्य धारणांची आणि सौदर्यविषयक संवेदनशीलतेची चिकित्सा करणारे हे कला प्रदर्शन आहे.

भारताच्या स्वातंत्र्याची  ७६ वर्षे आणि सिंगापूरचा ५८ वा राष्ट्रीय दिवस असा योग साधून हे प्रदर्शन आयोजित होत आहे.

Mohan Naik
Road Issue In Goa : सोनाळ, तार, कडतरी गावचा रस्ता उंच करण्याची होतेय मागणी; 'या' समस्येमुळे ग्रामस्थ झालेत हैराण

मोहन नाईक हे दक्षिण गोव्यातील एका छोट्याशा गावातून येतात. आपल्या मुळाशी खरे राहून मोहनने आपल्या चित्रांमधून गोव्यातील ग्रामीण जीवनाचे चित्रण सातत्याने केले आहे. गोव्याच्या मोकळ्या परिसरातील तेजस्वी आणि उबदार रंग, स्त्री-पुरुष, बकऱ्या अशा ग्रामीण प्रतिमा तो प्रभावीपणे आपल्या चित्रातून सादर करतो.

पुर्वाश्रमी शिक्षक असलेल्या मोहन नाईक यांनी, कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीवर पूर्ण लक्ष केंद्रीत करता यावे म्हणून आपला शिक्षकी पेशा सोडून दिला.  त्याच्या दीर्घकालीन चित्रकलेच्या व्यासंगातून एक अनोखी ‘मोहन नाईक’ शैली तयार झाली आहे ज्यांची समिक्षकांनी खूप प्रशंसा केली आहे.

गोव्याचा वारसा आपल्या विशेष शैलीतून मांडणाऱ्या  मोहन नाईक यांची चित्रे खचितच ‘ह्रदयस्पर्शी म्हणावी अशी आहेत. त्याच्या वैशिष्टपूर्ण चित्रांमुळेच  मोहन नाईक यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शने राष्ट्रीय पातळीवर झाली आहेत. गोव्याच्या आघाडीच्या चित्रकारांपैकी एक म्हणून ते आज ओळखले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com