व्यावसायिक नाट्यक्षेत्रातील नविता

नविता नाईक हिला सर्वात प्रथम नाट्य क्षेत्रामध्ये त्यांचे यजमान नरेश यांचं मार्गदर्शन मिळाले
Drama
Drama Dainik Gomantak
Published on
Updated on

निवृत्ती शिरोडकर

गावातील पुरूष नाट्य कलाकारांबरोबरच स्त्री कलाकारही आपल्या अभिनयाद्वारे रंगमंचावर नऊ रस अविष्कारित करून स्वतःची ओळख तयार करत आहेत. गुळेली- सत्तरी येथे जन्मलेली नविता नाईक हिचा आवर्जून त्यापैकी एक असा उल्लेख करावा लागेल. रंजीता हे तिचे माहेरचे नाव.

तिच्या अंगातील नाट्यकलेला वाव मिळला तेव्हा ती दोन मुलांची आई बनली होती. तिचे पती नरेश यांनीच तिला आग्रह करून व प्रोत्साहन देऊन नाटकात काम करण्यासाठी प्रवृत्त केले. अशातर्हेने ‘म्हाताऱ्या कोमरी फुटली’ या नाटकाच्या निमित्ताने गावच्या वेताळ देवाच्या पायाकडे तिने आपली पहिली भूमिका सादर केली.

त्यानंतर साई किरण महिला नाट्यमंडळाच्या फक्त स्रियांचा समावेश असलेल्या चार नाटकांमध्ये दर्जेदार भूमिका करून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मागच्या वर्षी ‘कला चेतना- वळवय’ निर्मित व सुनील नाईक प्रस्तुत ‘चुकांन मिस्टेक’ या नाटकात तिने एक छोटीशी भूमिका केली जी प्रेक्षकांच्या मनात भरली.

Drama
Goa Fisherman in Delhi: कौतुकास्पद! पेले यांच्यासह गोव्यातील तीन दांम्पत्यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीत आमंत्रण

नविता नाईक हिला सर्वात प्रथम नाट्य क्षेत्रामध्ये त्यांचे यजमान नरेश यांचं मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे नाट्य क्षेत्रातील तिचे प्रथम गुरु तेच असे ती म्हणते.

नाटकात अधिकाधिक कामे करताना तिला इतरांचेही मार्गदर्शन मिळत गेले आणि तिचे एक एक पाऊल पुढे टाकण्याची पडत गेले. ‘चुकान मिस्टेक’ नाटकात भूमिका करताना राजदीप नाईक, सुचिता नार्वेकर, प्रेमानंद गुरव यांनी शिकवलेले बारकावे आणि मार्गदर्शन ती स्मरते.

अभिनयाव्यतिरिक्त भजन, सामाजिक उपक्रमात भाग घेणे यातही नाविता सहभागी असते. लहानपणापासून तिच्यावर नाटकाचा पगडा आहे.

तिचे काका संतोष नाईक यांनी ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या नाटकात भूमिका बजावल्या आहेत.

भाऊ आशुतोष नाईक, पती नरेश नाईक, व दिर शरद  यांच्या दर्जेदार भूमिका जवळून पाहण्याची संधी तिला मिळाली व त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून तिनेही नाट्य क्षेत्रात पदार्पण केले.

नविताची खंत आहे की त्यांच्या गावात जेव्हा महिलांचे नाटक करायचे प्रयत्न होतात तेव्हा त्यात भाग घ्यायला कोणी स्त्रीसहज तयार होत नाही. नविता म्हणते, ‘मला असं वाटतं की स्त्रियांनी पुढे यायला हवे.

कोण काय म्हणतील याचा विचार न करता कलेच्या नजरेतून या कामाकडे पाहिले गेले पाहिजे. जी कला माझ्या अंगात होती ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला रंगमंच उपलब्ध झाला आणि कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यातच मला खुप काही मिळाले.’

Drama
Goa Kashi Tourism: बीच नव्हे धार्मिक पर्यटनाला प्राधान्य, गोव्याला पछाडून काशी पर्यटकांच्या संख्येत अव्वल

’अंगातील कला रंगमंचावर सादर करणे, एवढ्यापुरतेच नाट्यक्षेत्र मर्यादित नसते. नाट्य माध्यमातून केवळ मनोरंजन नव्हे, तर समाज प्रबोधनही करता येते. आज हौशी कलाकारामुळेच उत्सवी रंगभूमी अजून तग धरून आहे.

आपण कलेसाठी काय करू शकतो हा विचार त्यांनी केला म्हणूनच आज रंगभूमीला चांगले दिवस आले आहेत. अनेक मुली आज मोठ्या संख्येने रंगभूमीवर पदार्पण करताना दिसत आहे.  त्यांना शाबासकीची थाप द्यायला हवी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घरच्यांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा द्यायला हवा.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com