Goa Kashi Tourism: बीच नव्हे धार्मिक पर्यटनाला प्राधान्य, गोव्याला पछाडून काशी पर्यटकांच्या संख्येत अव्वल

कोरोनानंतर श्रीकाशी विश्वनाथ धाम येथे पर्यटकांच्या संख्येत दहापट वाढ झाली आहे.
Varanasi
VaranasiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Kashi Tourism: पुरातन वारसा जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणारे जगातील सर्वात जुने शहर असलेले काशी पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनत आहे. आपला वारसा आणि सांस्कृतिक मूल्ये जपत काशी सर्वाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरले आहे.

कोरोनानंतर श्रीकाशी विश्वनाथ धाम येथे पर्यटकांच्या संख्येत दहापट वाढ झाली आहे. पर्यटन वाढल्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला देखील चांगलीच गती मिळाली आहे.

काशी मंदिरे आणि घाटांसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर आहे. परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालून काशी सरकारच्या धार्मिक पर्यटनाला चालना देत आहे. आकडेवारीनुसार पर्यटन संख्येबाबत वाराणसी गोव्यापेक्षाही पुढे आहे. 2022 पर्यंत, मथुरा 6.5 कोटी पर्यटकांसह राज्याच्या यादीत अव्वल आहे.

त्यानंतर ताज सिटी आग्राचा नंबर लागतो येथे परदेशी पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. राज्याच्या पर्यटन विभागाच्या वेबसाइटनुसार, कोविड महामारीपूर्वीच्या तुलनेत दहापट जास्त पर्यटक आहेत. 2019 मध्ये येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे 68 लाख होती. 2020 मध्ये कोविड दरम्यान ते 10 लाखांपेक्षा कमी झाले होते. यंदा केवळ श्रावण महिन्यातच हा आकडा एक कोटीच्या पुढे गेला आहे.

Varanasi
Spicejet Sale: मुंबई - गोवा विमानाचे तिकीट केवळ 1,515 रूपयांत; स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पाइसजेटचा सेल

डिसेंबर 2021 मध्ये कॉरिडॉरचे उद्घाटन झाल्यापासून दहा कोटी पर्यटकांनी मंदिराला भेट दिली आहे. जगप्रसिद्ध गंगा आरती, गंगा समुद्रपर्यटन, काशीचा सांस्कृतिक-आध्यात्मिक वारसा, गंगा घाटांचे सौंदर्य तसेच हिंदू, बौद्ध, जैन, शीख या धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असल्याने जगभरातील शिवभक्तांचे ध्येय गाठायचे आहे. असे काशी विश्वनाथ टेंपल ट्रस्टचे सीईओ सुनील वर्मा यांनी हिंदी वृत्तपत्र जागरणला माहिती देताना म्हटले आहे.

काशी विश्वनाथ धामच्या पुनर्विकासानंतर शहरात पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाराणसीमध्ये पर्यटकांची वाढलेली संख्या 'सांस्कृतिक प्रबोधना'चे लक्षण आहे असे स्थानिक खासदार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच 'मन की बात'मध्ये सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com