Goa Politics: आसन स्थिर, पण भविष्याच्या उदरात अनेक छटा

Ponda Municipality: पालिका निवडणुकीत राजकारणाची ‘प्यादी’ ते कसे हलवतात याकडे फोंडावासीयांचे लक्ष आहे.
Ponda Municipality
Ponda MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Municipality: फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरुद्ध आठ नगरसेवकांनी अविश्‍वास ठराव आणल्यामुळे रितेशच्या आसनाला हादरा बसतो की काय असे वाटायला लागले हेाते, पण या आठपैकी एक असलेल्या शांताराम कोलवेकरांनी भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केल्यामुळे पुढील पाच महिने रितेशच फोंड्याचे नगराध्यक्ष असणार हे जवळ जवळ निश्‍चित झाले आहे.

यामुळे अविश्‍वास ठराव चर्चेला येण्यापूर्वीच तो बारगळल्यात जमा झाला आहे. वास्तविक पूर्वी कोलवेकर हे भाजपचे निष्‍ठावान कार्यकर्ते म्हणून गणले जात होते, पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी फोंड्याचे म.गो. पक्षाचे उमेदवार केतन भाटीकर यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे ते भाजपपासून दूर गेल्यासारखे झाले होते.

Ponda Municipality
Blog: प्रगत पाश्‍चात्य देशांची बरोबरी दृष्टिपथात

त्याचेच पुढचे पाऊल म्हणून रितेशविरुद्धच्या अविश्‍वास ठरावावर सहीही झाली होती, पण त्यांच्या घरवापसीमुळे रितेशचे आसन परत एकदा बळकट झाले आहे. त्याचबरोबर पालिका निवडणुकीच्या तोंडावर फोंड्यातील भाजपला ऊर्जा मिळाली आहे. ‘दिल को देखो चेहरा ना देखो’ असे जरी म्हटले जात असले, तरी राजकारण्यांना जाणणे हे कठीण काम असते.

फोंड्यातील भाजपात त्यांची गटबाजी स्पष्टपणे दिसत असून या गटबाजीचे प्रात्यक्षिक विधानसभा निवडणुकीतही बघायला मिळाले होते. या गटबाजीमुळेच भाजपचे रवी नाईक यांना काटावरचा विजय प्राप्त झाला होता. आता कोलवेकरांच्या पुर्नप्रवेशामुळे भाजपमधली अंतर्गत गटबाजी शमेल असे वाटत असले तरी ती तात्पुरतीही ठरू शकते.

पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही गटबाजी परत एकदा डोके वर काढू शकते. पालिका निवडणुका जवळ आल्या असल्या, तरी जोपर्यंत प्रभाग रचना आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत राजकारणाची दिशा ठरविणे कठीण आहे हेही तेवढेच खरे आहे. सध्या फोंडा पालिकेचे 15 प्रभाग असले, तरी येत्या निवडणुकीत ते 16 होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या तीन निवडणुकीचा आढावा घेतल्यास प्रत्येक निवडणुकीत एक प्रभाग वाढल्याचे दिसते. यंदाही या प्रथेची पुनरावृत्ती होऊ शकते तसे झाल्यास संपूर्ण प्रभाग रचना वाढू शकते, पण जर तरची शक्यता करून काही नगरसेवकांनी व संभाव्य उमेदवारांनी शह-काटशहाच्या राजकारणाला सुरवात केली आहे.

Ponda Municipality
Blog: 'चतुरंग'चे तिसावे रंगसंमेलन गोव्यात

अविश्‍वास ठरावाला शह देऊन विरोधकांना ‘चेकमेट’ दिल्यामुळे फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांच्या गोटात शांतता वाटत असली, तरी पालिका निवडणुकीत राजकारणाची ‘प्यादी’ ते कसे हलवतात याकडे फोंडावासीयांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे रितेशचे आसन स्थिर झाल्यासारखे वाटत असले तरी भविष्याच्या उदरात बऱ्याच राजकीय घटना दडल्या आहेत हेच खरे.

कालाय तस्मै नमः

आता भाजप मध्ये पुनर्प्रवेश केलेल्या शांताराम कोलवेकरांमुळे दीड वर्षांपूर्वी रितेश नाईक यांना नगराध्यक्षपदापासून वंचित व्हावे लागले होते. त्यावेळी खरे तर भाजपमध्ये प्रवेश केलेले रितेश हेच नगराध्यक्ष होणार होते, पण कोलवेकरांनी ऐनवेळी कलाटणी देऊन नगराध्यक्षपद पटकावले होते. त्याच कोलवेकरांना आता नगराध्यक्षपदासाठी रितेशना पाठिंबा द्यावा लागत आहे. कालाय तस्मै नमः म्हणतात ते हेच.

काँग्रेस गोटात निराशा

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व मगोप या तीन पक्षांच्या नगरसेवकांनी आणलेला अविश्‍वास ठराव संमत झाल्यास काँग्रेसचे विलियम आगियार यांना नगराध्यक्षपद मिळणार होते, पण आता या अनपेक्षितपणे घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे फोंड्याच्या काँग्रेस गोटात नैराश्‍य पसरल्याचे दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com