Goans Pictures: मॉस्को येथील प्रदर्शनात गोमतकीयांची चित्रे

भारतीय आणि रशियन चित्रकारांच्या जलरंग माध्यमातील चित्रांचे प्रदर्शन मॉस्को आणि नवी दिल्ली येथे होत आहे.
Pictures
PicturesDainik Gomantak
Published on
Updated on

Goans Pictures: आयडब्ल्यूएस इंडिया आर्ट गॅलरी (भारत) आणि आयडब्ल्यूएस सारेह आर्ट गॅलरी (रशिया) या दोन्ही संस्थांनी मिळून आयोजित केलेल्या भारतीय आणि रशियन चित्रकारांच्या जलरंग माध्यमातील चित्रांचे प्रदर्शन मॉस्को आणि नवी दिल्ली येथे होत आहे.

या प्रकल्पाचा पहिला भाग म्ह्णून, निवडण्यात आलेले ३५ भारतीय चित्रकार आणि ३५ रशियन चित्रकार अशा एकूण ७० चित्रकारांच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन मॉस्को येथील गॅलरीमध्ये १८ जुलै रोजी सुरु झाले. हे प्रदर्शन २७ ऑगस्टपर्यन्त मॉस्को शहरात चालू असेल.

Pictures
Illegal Dumping In Dhavali: ढवळीतील भंगारअड्डे हटवण्याचा मार्ग मोकळा!

विशेष म्हणजे, या प्रदर्शनासाठी भारतातून निवडल्या गेलेल्या ३५ भारतीय जलरंग चित्रकारांपैकी ५ चित्रकार गोमंतकीय आहेत. आयडब्ल्यूएसच्या गोवा शाखेचे प्रमुख कालिदास सातार्डेकर यांनी अधिकाधिक गोमंतकीय कलाकारांची चित्रे या प्रदर्शनासाठी निवडली जातील या दृष्टीने विशेष प्रयत्न केले होते.

हे आहेत चित्रकार...

चिराग कामत... (मल्लिकार्जुन मंदिर)

प्रसाद नाईक... (बोट मिट)

कालिदास सातार्डेकर... (खजुराहो )

सौमित्र बखले... (गोवन विलेज )

गोविंद सिलिमखान... (चॅपल इन गोवा)

Pictures
Arambol Tourism: हरमल येथील स्वीट लेककडे दुर्लक्ष, पथदीप नसल्याने पर्यटकांची गैरसोय

कालिदास सातार्डेकर, गोविंद सिलिमखान, चिराग कामत, प्रसाद नाईक, सौमित्र बखले या गोमंतकीय चित्रकारांची चित्रे मॉस्कोमध्ये चालू असलेल्या प्रदर्शनात रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या प्रकल्पाचा दुसरा भाग म्हणून हेच प्रदर्शन नवी दिल्ली येथील मालवीय नगरमधील आयडब्ल्यूएस आर्ट गॅलरीमध्ये १८ ते २७ नोव्हेंबर या काळात आयोजित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com