Ganesh Chaturthi: आज सायंकाळी आकाशात पाहाच

चंद्र हा पृथ्वीवरल्या जीवनावर प्रगाढ प्रभाव पाडणारा अवकाशस्थ उपग्रह आहे
Ganesh Chaturthi: Moon
Ganesh Chaturthi: MoonDainik Gomantak

पणजी: भाद्रपद शुक्ल चतुर्थीला (Ganesh Chaturthi) चंद्राचे (Moon) तोंड पाहू नये, असा समज (की अंधश्रद्धा) जनमानसांत आहे. मात्र, या अंधश्रद्धेला चिकटून राहिल्यास अवकाशातल्या एका अनुपम घटनेचे साक्षीदार व्हायचे भाग्य आपल्याला लाभणार नाही. अर्थात, आकाश निरभ्र असले तरच हा नजारा आपल्याला दिसणार आहे. दिवस मावळताना अवकाशस्थ ग्रह - ताऱ्यांचे हे मनोरम संधान प्रत्येक विज्ञानप्रेमींना पाहाण्याजोगेच ठरेल.

अर्थात चवथीचा चंद्र आकाशात नेहमीप्रमाणे आपली सोनेरी कोर घेऊन हजर असेलच. मात्र, त्याच्यासोबतीने अत्यंत तेजस्वी असा शुक्र, कन्या नक्षत्र समूहातला स्पायका हा तारा, बुधाचा ग्रह तसेच आपल्या पृथ्वीला समीप असलेला मंगळ यांची वैशिष्ट्यपूर्ण अशी मांडणी आपल्याला पाहता येईल. अर्थात मावळत्या सूर्याला निकट असल्यामुळे बुध आणि मंगळ तसे सहजपणे दिसणार नाहीत. मात्र, चंद्र - शुक्र आणि स्पायकाची आभा डोळ्यांचे पारणे फेडत ती उणीव भरून काढील. याचवेळी पूर्वेकडील आकाशात गुरू आणि शनीचा ग्रह हे वायुयुक्त महाग्रह आपल्या सर्व तेजासह चमकत असतील.

Ganesh Chaturthi: Moon
Goa Ganesh Festival: वैशिष्ट्यपूर्ण गोमंतकीय 'चवथ'

खगोलशास्त्रात रुची असलेल्यांबरोबरच आकाशदर्शनाचे वेड असलेल्यांसाठी ही अमूल्य अशी संधी आहे. अवकाशाच्या छायाचित्रणात स्वारस्य असलेल्यांनाही ही अनुभूती घेता येईल. यानिमित्ताने सश्रद्धांना चंद्रदर्शनाला पारखे करणाऱ्या एका गैरसमजुतीचेही निराकरण परस्पर करता येईल.

Ganesh Chaturthi: Moon
Ganesh Chaturthi Special: आज 'चंद्र दर्शन' का घेऊ नये जाणून घ्या कारण

चंद्र पूजनीय, दर्शन चुकवू नये

चंद्र हा पृथ्वीवरल्या जीवनावर प्रगाढ प्रभाव पाडणारा अवकाशस्थ उपग्रह आहे. त्याच्यामुळेच समुद्राला भरती - ओहोटी येते आणि पृथ्वीचरांच्या शरीरातील अनेक क्रियाही प्रभावित होत असतात. पृथ्वीच्या भ्रमंतीवरही तो प्रभाव पाडतो आणि जीवधारणेस साहाय्य करतो. त्यामुळे तो मानवाला सतत पूजनीय असावा आणि त्याचे दर्शन कधी चुकवले जाऊ नये, हेच योग्य.

- गौतम जल्मी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com