Manohar International Airport मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाचे विमानतळाच्या गेट बाहेर लावण्यात आलेले ‘न्यू गोवा’चे फलक आज हटवून त्या जागी ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे फलक लावण्यात आले.त्यामुळे उद्घाटनापासून विमानतळाच्या नावावरून पसरलेला संभ्रम दूर होऊ लागला आहे.
नवे फलक झळकू लागल्याने मोपा विमानतळ यापुढे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावाने ओळखला जाईल. मोपा विमानतळाच्या उदघाटनापूर्वी विमानतळच्या गेट बाहेर व विमानतळाशी निगडीत चार पदरी मार्गालगतच्या खांबांवरील फलकावर ‘न्यू गोवा एअरपोर्ट’ असे फलक लावले होते.
मनोहर पर्रीकर यांच्या समर्थकांनी केंद्र सरकारशी पंतप्रधानानी जाहीर केलेल्या ‘मनोहर आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट’ या नावाची पूर्तता व्हावी, यासाठी प्रयत्न चालवले होते.
युवक ज्ञानेश्वर वरक यांनी ईमेलद्वारे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, राज्य प्राधिकरण मुख्य सचिव, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि राज्यपालांकडे न्यू गोवा इंटरनॅशनल एअर पोर्ट या नावाला आक्षेप घेऊन तक्रार केली.
या तक्रारीची दखल घेऊन यापुढे ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ याच नावाने उल्लेख केला जाईल, असे शानभोग यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले होते.
हृदयात बांदोडकरच !
पर्रीकर यांच्या नावाची कुणीही मागणी केली नव्हती. लोकांच्या हृदयात भाऊसाहेब बांदोडकरच आहेत, असे मोपा भाऊसाहेब बांदोडकर नामकरण समितीचे निमंत्रक सुभाष केरकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.