चांदरच्या शिव मंदिरावरुन गोव्यात मंदिर बांधण्याची विशिष्ट पध्दत प्रचलीत

चांदरचे शिवमंदिर मंदिरशास्त्राच्या आधारावर बांधले होते, याची तीळमात्रही शंका नाही. या मंदिरावरून गोव्यात मंदिर बांधण्याची विशिष्ट पध्दत प्रचलीत होती हे कळते. त्या मंदिराला वापरण्यात आलेला मातीचा व गाळाचा गिलाव ऐवढ्या पिढ्या संपूनसुध्दा अजूनही शाबूत आहे.
संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र Dainik Gomantak
Published on
Updated on

Chandor shiva temple: गोव्यात 4थ्या शतकात (4th Century) राजा देवराजभोज (King Devraj Bhoj) या राजाचे राज्य होते. पण या शतकातील आज गोव्यात (Goa) कुठेही मंदिर किंवा अवशेष मिळत नाहीत. पण याला चार-किंवा पांच मंदिरांचा अपवाद आहे. जुन्या काबीजादातील मंदिरे (Goa Temples) पोर्तुगीजानी (Portuguese) पाडली असा उल्लेख सापडतो. पण मग नव्या काबीजातली 4 ते 5 मंदिरे सोडल्यास, बाकीच्या पुरातन मंदिरांचे काय झाले असा प्रश्न मनात येतो. नुतनीकरणाला ही मंदिरे बळी पडलेली आहेत.

संग्रहीत छायाचित्र
राजकारणात कारनामे करायला गोवा अग्रेसर

चांदर हा गांव पणजी शहराहुन अंदाजे 40 कि.मी अंतरावर आहे. ४थ्या शतकातील राजा देवराजभोज हे सासष्टी तालुक्यातील चांदरहुन राज्य करत होते. यामुळे चांदर गोव्याची पहिली राजधानी होती असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 4थ्या शतकातील राजा देवराज भोजाच्या ताम्रपटात या गांवाचा उल्लेख चंद्रऊर असा झालेला आहे. त्याच्या नंतरच्या काळात सापडलेले ताम्रपट चंद्रऊरला चंद्रपूर असे संबोधतात. कंदंब राजांनी सुध्दा 11व्या शतका पर्यंत येथूनच राज्य केले. 11व्या शतकात कंदंब राजा विरवर्मदेव यांनी गोव्याची राजधानी गोपकपटट्ण (म्हणजे आजचे गोवा वेल्हा) येथे हलविली. 13व्या ते 14व्या शतकात कंदंब साम्रराजाने चंद्रपुरला पुन्हा एकदा राजधानीचा दर्जा दिला. 14व्या शतकात होन्नावरच्या नवाबाने चंद्रपूरवर हल्ला करुन ते उध्वस्त केले. 1320 मध्ये मोहम्मद बीन तुघलकच्या सैन्याने चंद्रपूरवर हल्ला केला. पुढे चंद्रपूर पोर्तुगीजाच्या आक्रमणाला व बाटाबाटीला बळी पडले.

चंद्रपूरचा अपभ्रंश पुढे चांद्रा किंवा चांदर असा झाला व पुढे पोर्तुगीज काळात ते चांदोर झाले. हल्ली तर काही या गांवाचे नांव 'शांदोर' असे ऊच्चारतात; कारण अमेरीकेमध्ये असलेले शीकागो शहराचे नांव इंग्रजीत Chicago असे लिहिले जाते. पण गोवा ही अमेरिका नाही हे त्यांना लक्षात नसावे.

संग्रहीत छायाचित्र
कोणताही राजकारणी गोव्यासमोर असलेल्या गहन समस्यांवर चर्चा करत नाही

1930 मध्ये फादर हॅनरी हॅरश गोव्यात आले. त्यांना गोव्याच्या प्राचीन इतिहासाबद्द्ल खूप कुतूहल होते असे त्यांनी केलेल्या कामावरुन व त्यांच्या लिखाणा वरुन समजते. त्यांनी चांदर 'कॉट' येथील देवळांतोळोय नांवाच्या जागेत उत्खननाचे काम हाती घेतले. तेथे असलेला मातीचा ढिगारा व त्या जागेच्या नावांच्या कुतूहलाने त्यांनी तेथे उत्खनन सुरु केले असावे. देवळांतोळोय म्हणजे देवळाची तळी होय! येथे मंदिराची तळी असावी. पण आज तेथे तळीच्या कुठल्याही खुणा किंवा अवशेष सापडत नाही.

उत्खननाच्या वेळी त्यांना तेथे भला मोठा पाषाणी नंदी सापडला. नंदीचे डोके उध्वस्त केलेले आहे. नंदी बहुतेक ‘टाल्क क्लोरायट सीष्ट' नावाच्या दगडा पासून बनवलेला दिसतो व निश्चितच. कदंब कालीन आहे. त्यांना तेथे मोहम्मद बीन तुघलकच्या काळातली नाणी सुध्दा सापडली. 1974 साली तेथे भारतीय पुरातत्व खात्याने पुन्हा उत्खनन केले. परत याच जागेवर 2004 साली भारतीय पुरातत्व खात्याने पुन्हा एकदा उत्खनन केले. विटांनी बांधलेला मंदिराचा पाया उत्खननाच्या वेळी तेथे आढळला. विटा एकत्र राहाण्यासाठी मातीचा उपयोग केला गेला होता व भीतींची दाटी भरण्यासाठी विटांचे तुकडे व नदीकाठचा गाळ वापरण्यात आला होता. मंदिराच्या गर्भगृहाचा, सभामंडपाचा, व मुखमंडपाचा पायाही येथे सापडला.

संग्रहीत छायाचित्र
अग्निशमन अधिकारी प्रशांत धारगळकर

मंदिराचे छप्पर दगडी खांबांच्या आधारे उभे असावे कारण सभामंडपाच्या भागात ठराविक अंतरावर दगडी पाया (pillar bases) सापडलेले आहेत. मंदिराचे छप्पर बहुतेक लाकडी व कौलारु असावे, कारण येथे तांब्याचे खिळेही सापडलेले आहेत. भारतीय पुरातत्व खात्याने सन 2000 साली येथे परत उत्खन केले. त्यात त्यांना मंदिराचे कोरीव काम केलेले अधिष्ठान सुध्दा सापडले. भारतीय पुरातत्व खात्याच्या 'चांदोर 2000' नामक अहवाला अनुसार या प्रकारची अधिष्ठाने 7व्या शतकाल्या मंदिरात सापडतात.

चांदरचे शिवमंदिर मंदिरशास्त्राच्या आधारावर बांधले होते, याची तीळमात्रही शंका नाही. या मंदिरावरून गोव्यात मंदिर बांधण्याची विशिष्ट पध्दत प्रचलीत होती हे कळते. त्या मंदिराला वापरण्यात आलेला मातीचा व गाळाचा गिलाव ऐवढ्या पिढ्या संपूनसुध्दा अजूनही शाबूत आहे.

- डॉ. रोहित फळगांवकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com