डिचोलीत ज्येष्ठ नागरिकाची करुण कहाणी..!

पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी खड्डेही खोदण्याची पाळी
Emotional story of senior citizen in bicholim
Emotional story of senior citizen in bicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी प्रत्येक माणसाची धडपड चालू असते. परिस्थितीमुळे काहीजण अशक्यप्राय कामे करताना दिसून येतात. सत्तरी ओलांडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या कर्मभोगात सध्या असेच दिवस आले आहेत. मोलमजुरी करण्याचे त्यांचे वय नव्हे, की शरीरही त्यांना साथ देत नाही. तरीदेखील पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी त्यांची आजही धडपड सुरु आहे. वेळप्रसंगी खड्डे खोदण्याचे कामही ते करतात. मूळ खन्नूर-बेळगाव येथील पण गेल्या सहा वर्षांपासून डिचोलीत राहणाऱ्या चमन्ना आंगडी याच्या वाट्याला हे दुर्दैवाचे दिवस आले आहेत.

चमन्ना यांची व्यथा...

शहरातील कदंब बसस्थानकाबाहेर रोज सकाळी साधारण आठ वाजल्यापासून मजुरांचा गराडा जमलेला असतो. या गराड्यात महिला आणि पुरुष मिळून साठी पार केलेले काही मजूर मजुरीच्या प्रतीक्षेत असतात. या गराड्यापासून अलिप्त अशा ठिकाणी वयाची सत्तरी एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणजेच चमन्ना बसलेले नजरेला पडतात. अन्य मजूरलोकांप्रमाणेच ते ही मजुरीच्या प्रतीक्षेत थांबलेले असतात. बायकोने कापडी पिशवीत दिलेली जेवणाची शिदोरी हातात घेवून, कोणी मजुरीसाठी बोलावतात काय? त्याची ते आशेने वाट पाहत असतात. केवळ पोटासाठी न झेपणारे कामही करण्याची त्यांची तयारी असते. मात्र त्यांना नित्यनेमाने मजुरीही मिळत नाही. मजुरीसाठी कोणी बोलावले तर ठीक. अन्यथा बराचवेळ बसल्यानंतर ते चिंताक्रांत मुद्रेने दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाची प्रतीक्षा करीत माघारी फिरतात. सायंकाळी ते शहरातील वॉकिंग ट्रॅकजवळ बसून असतात. दया येवून कोणी काही हातावर ठेवलेच, तर चमन्ना ते मजबुरीने स्वीकारतात.

Emotional story of senior citizen in bicholim
Goa: तृणमूल आणि फुटबॉल

कुस्तीपटू ते ड्राइव्हर...

ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी चमन्ना यांची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपली जीवनगाथा थोडक्यात कथन करताना दुर्दैवात जे आहे, ते कोणालाच चुकत नाही. असे चमन्ना म्हणाले. सहा वर्षांपूर्वी आपण बायकोसह डिचोलीत आलो आहे. शहरातील एका भाड्याच्या खोलीत आम्ही दोघे राहतो. ज्या दिवशी पोटापाण्याची व्यवस्था होत नाही. त्यादिवशी पोट जमिनीला टेकवून झोपायचे. लहान पणापासून आपल्याला कुस्ती खेळण्याची आवड. कुस्तीच्या आखाड्यात आपण अनेकदा उतरलो आहे. आपल्या गावात कुस्तीपटू म्हणून आपल्याला ओळखतात. कुस्ती खेळतानाच आपल्या कंबरेला मार बसला होता. तेव्हापासून आपणाला सामान्याप्रमाणे सरळ उभे राहताना त्रास होतोय. असे चमन्ना यांनी सांगितले. आपण वाहनही चालवतोय, असे त्यांनी सांगितले.

Emotional story of senior citizen in bicholim
Goa: सायकलिंग बरोबर स्वच्छता मोहीम सुद्धा...

आपल्याला दोन मुली असून, त्या आपल्या भावाकडे असल्याचे सांगतात. मात्र म्हातार वयात मजुरीसाठी येण्या मागचे कारण सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले. त्यावरून त्यांची देखभाल करण्यास कोणी तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे. विभक्त कुटुंब पद्धती म्हणा किंवा अन्य कारणांमुळे म्हणा, आज अनेक ज्येष्ठ नागरिक एकाकी जीवन जगत आहेत. काहीजण तर एखाद्या वृद्धाश्रमात जीवन कंठत असल्याची अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. अशा अवस्थेत चमन्नाची धडपड बरेच काही सांगून जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com