Hirabai Pednekar : आद्य नाटककार हिराबाई पेडणेकर

Hirabai Pednekar : काळात रंगभूमीवर फक्त पुरुष कलाकारांचे वर्चस्व होते त्या काळात पहिले मराठी नाटक लिहिण्याचे धाडस हिराबाईंनी केले.
Hirabai Pednekar
Hirabai PednekarDainik Gomantak
Published on
Updated on

आसावरी कुलकर्णी

मूळ गोमंतकीय पण गोव्याबाहेर जाऊन ज्यांची प्रसिद्धी झाली अशा कालावंतामध्ये हिराबाई पेडणेकर यांचे नाव घेता येईल. गोमंतक मराठा समाजात जन्मलेल्या हिराबाई कलावंताच्या घरात जन्माला आल्या.

त्या नक्की गोव्यात जन्मल्या की सावंतवाडीत याबद्दल थोडासा संभ्रम आहे. त्यांच्या मावशी भीमाबाई त्यांना मुंबईत घेऊन गेल्या. धनिक प्रेमचंद रायचंद यांच्या घरात त्या वाढल्या. मुंबईसारख्या शहरात असल्यामुळे त्यांना उत्तम शिक्षण मिळाले. त्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे हे जरा दुर्मिळच होते. पं भास्करबुवा बखले यांच्याकडे त्यांनी संगीत शिक्षण घेतले.

घरी येणाऱ्या उच्चभ्रू व्यक्तीमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व लेखिका म्हणून बहरत गेले. गो. व देवल, कोल्हटकर आणि राम गणेश गडकरी यांचा घरी राबता असायचा.ज्या काळात रंगभूमीवर फक्त पुरुष कलाकारांचे वर्चस्व होते त्या काळात पहिले मराठी नाटक लिहिण्याचे धाडस हिराबाईंनी केले.जयद्रथ विडंबन नावाचे पूर्ण लांबीचे नाटक त्यांनी लिहिले, परंतु ते रंगमंचावर यायला तबबल १०० वर्षांचा कालावधी गेला.स्व. विजयकुमार नाईक यांच्या संस्थेतर्फे त्याचा प्रयोग फोंडा येथे करण्यात आला.

त्यांचे दुसरे नाटक दामिनी ललित कलादर्शन या नाट्यसंस्थेने सादर केले. खरंतर हे नाटक किर्लोस्कर संस्थेने कारावे अशी त्यांची इच्छा होती.परंतु एका स्त्रीने लिहिलेले नाटक करण्यास कदाचित किर्लोस्कर नाट्यमंडळीना कमीपणाचे वाटले असावे.

परंतु त्यांचे हे नाटक गाजले. अगदी चार वर्षे चालले. स्त्री पुरुष भेद कृत्रिम आहेत आणि ते असू नयेत असे पुरोगामी विचार या नाटकातून हिराबाई यांनी मांडले होते. त्यावेळेच्या काही संगीत नाटकातील पदे आणि चाली हिराबाईनी लिहिली होती असे म्हटले जाते.

Hirabai Pednekar
Goa Today's Update: दिवसभरातील ठळक घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर

त्यांचे शेवटचे दिवस त्यांनी कृष्णाजी नेने यांच्यासोबत पालशेत येथे घालविले. शेवटचे दिवस त्यांनी अज्ञातवासातच घालविले म्हटल्यास वावगे ठरू नये. स्व. विजयकुमार नाईक लिखित आणि दिग्दर्शित पालशेतची विहीर हे नाटक हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनावर आधारित आहे. पुरुष वर्चस्व असलेल्या क्षेत्रात धाडसाने लेखणी चालविणाऱ्या आद्य नाटककार हिराबाई पेडणेकर यांना महिलादिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com