Goa Culture: का निवडुंगाच्या पणत्यांनी साजरा होतो दिवजोत्सव? जाणून घ्या गोव्यातील अनोखी परंपरा

गोव्यातील आगळ्या वेगळ्या परंपरा नेहमीच चर्चेत असतात, गोव्याची संस्कृती अनेक रीतिरिवाजांनी भरलेली आहे.
Goa Diwali Culture
Goa Diwali CultureDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील आगळ्या वेगळ्या परंपरा नेहमीच चर्चेत असतात, गोव्याची संस्कृती अनेक रीतिरिवाजांनी भरलेली आहे. काही लोकांचा समज आहे की गोवा पाश्चाच्य संस्कृतीचा अवलंब करतो, मात्र, तसे नसुन गोव्याची स्वत:ची अशी एक संस्कृती आहे. आज त्यापैकीच एक परंपरेची ओळख आज करुन घेऊया; देशभर दिवाळीचा धुमधडाका सुरु असताना मात्र गोव्यात अतिशय साधेपणाने दिवाळी साजरी केली जाते. फटाक्यांची आतिषबाजी किंवा रोषणाई दुर-दुर पहायला मिळत नाही. सध्या पारंपरिक पद्धतीनं तयार केलेल्या मातीच्या पणत्या मात्र दारात लावलेल्या असतात.


(Goa Diwali Culture)

Goa Diwali Culture
Iffi Goa : गेल्या 18 वर्षात गोव्यातला इफ्फी किती बदलला?

गोव्यात नरकचतुर्थी चा दिवस म्हणजे ‘धाकटी’ आणि तुळशीचं लग्न म्हणजे 'व्हडली’ दिवाळी अशी दिवाळीची वेगळी ओळख इथे पहायला मिळते. गोव्यात हि व्हडली दिवाळी शेवट सुरु होते. आणि याच दिवाळीला इथल्या जनमानसात महत्व आहे. याच काळात गोव्यातील काणकोण परिसरात पागी समाजाकडून वेगळ्याच पद्धतीनं ‘दिवाजोत्सव’ म्हणजे दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो.

गोव्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं ‘दिवजोत्सव’ साजरा होतो. मात्र काणकोणचा ‘पागी’ समाजात साजरा होणारा दिवजोत्सव खूप वेगळा असतो. कार्तिक शुद्ध द्वादशीला काणकोण तालुक्यातील तामने-लोलये या गावात निवडुंगाचे दिवज म्हणजेच निवडुंगाचे दिवे, पणत्या करून दिवाजोत्सव साजरा केला जातो.

काणकोणमध्ये नुकताच हा दिवजोत्सव साजरा करण्यात आला. गोव्यात अनेक ठिकाणी दिवजोत्सव होतो त्यात महिला मंदिरात जमून हा उत्सव साजरा करतात. यामध्ये त्यांच्या हातात मातीच्या पेटत्या दिवजा असतात. काही ठिकाणी या पेटत्या दिवजा डोक्यावर घेतल्या जातात पण काणकोणच्या तामने-लोलये गावातील महिला हातांच्या पाचही बोटांवर या दिवजा पेटवतात.

निवडुंगाच्या दिवजा म्हणजे नेमकं काय?

तामने-लोलये गावातील कुडतरपुरुष देवस्थानात हा आगळा वेगळा दिवाजोत्सव साजरा होतो. निवडुंगाच्या की फांद्या कापून त्या हाताच्या बोटांमध्ये अडकवल्या जातात. या निवडुंगाच्या तोंडाला कापून त्यात वात पेटवली जाते. निवडुंगाच्या पानात गर असल्यामुळे ते बोटात सहजपणे बसते. दिवाळीच्या काळात होणाऱ्या या दिवाजोत्सवच्या इतिहासाबद्दल वेगवेगळ्या लोकांकडून दैनिक गोमन्तकने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता इथल्या लोक समजुतीचा, लोकसंस्कृतीचा एक वेगळा भाग समजला.

कोणकोणचा दिवाजोत्सव इतर दिवाजोत्सव पेक्षा खूप वेगळा आहे. याला तशी पुरातन परंपरा नाही. मात्र तरी देखील जुना इतिहास आहे. कुडतरी येथील श्री महामाया शांतादुर्गा चामुंडेश्वरी कुडतरीकरीण हे अनेक समाजांचे कुलदैवत आहे. तसेच ते मोठ्या प्रमाणावर विखुरलेल्या पागी समाजाचेही दैवत आहे. पोर्तुगीजांच्या राजवटीत, बटाबाटीच्या काळात धार्मिक छळाला कंटाळून पागी समाजातील काही जणांनी हि महामायेची मूर्ती केपे गावी स्थलांतरित केली. तिचेच देऊळ बांधून उत्सव सुरु केला. या उत्सवाला मातीचेच दिवज पुजले जायचे.’ दीक्षा पागी यांनी दिवाजोत्सवाचा पाया कसा रचला गेला हि माहिती दिली.

Goa Diwali Culture
Coffee Habit: कॉफीचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते...

मातीच्या दिवजांमधून निवडुंगाचे दिवज कसे तयार झाले याबद्दल त्यांनी खुलासा केला त्या म्हणाल्या ‘काणकोण मधून केपे येथील या देवळात उत्सवाला गेले असता तेथील लोकांशी या काणकोणवासीय स्थानिक लोकांचा वाद झाला. आपला अपमान झालाय असं समजून हातात मातीचे दिवज घेऊन आलेली मंडळी काणकोणला परत निघाले. वाटेत निवडुंगाच्या झाडांमध्ये ते पेटते दिवे रागाने टाकून दिले. पण नंतर गावातल्या लोकांच्या स्वप्नात देवाने दृष्टांत दिला आणि जिथे निवडुंगात दिवे टाकून दिले तिथे माझे मंदिर बांधा आणि निवडुंगाचेच दिवजा पूजा असं सांगितल्यामुळे तेव्हापासून मातीच्या दिवजांऐवजी निवडुंगाच्या दिवजा पुजल्या जाऊ लागल्या’ अशी आख्यायिका इथे प्रचलित आहे. ग्रामीण भागातील जनमानस अशा आख्यायिकांवर तयार होत गेलेलं दिसून येतं.

दिवाळीच्या काळात होणारा हा दिवाजोत्सव लोकसंस्कृतीचं एक वेगळं उदाहरण आपल्यासमोर ठेवतो. काणकोण हि लोकसंस्कृतिची खाण आहे. इथे लोकमानसात रुजलेल्या अनेक चित्र विचित्र चालीरीतींचे प्रकार अनुभवायला मिळतात. त्यातल्याच निवडुंगाचा दिवाजोत्सव प्रकार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com