Doctor's Day: कोरोनाच्या संकट काळाने पाहिली डॉक्टरांची कसोटी

पश्चिम बंगालमधील राजकीय नेते, फिजिशियन, स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. बिधनचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ भारतात राष्ट्रीय डॉक्टरदिन (Doctor's Day) दरवर्षी 1 जुलै रोजी भारतीय वैद्यकीय संघटनेकडून साजरा केला जातो.
Doctor's Day
Doctor's DayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोरोनाने (Covid 19) सर्वच लोकांना संकटात टाकले असले, तरी त्यामुळे खासकरून आरोग्य क्षेत्रावर विलक्षण ताण आला. डॉक्टरांना (Doctor) रुग्णांच्या सेवेत अथक वाहून घ्यावे लागले आणि याभरात कित्येक डॉक्टरांना स्वतः संसर्गाचा सामना करावा लागला. आज साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त ''गोमन्तक''शी बोलताना भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. विनायक बुवाजी यांनी महामारीच्या या कठीण काळाने सर्वांना डॉक्टर व आरोग्य क्षेत्रातील इतर कर्मचाऱ्यांचे योगदान आणि त्यांचा त्याग यांची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे, असे मत व्यक्त केले. (Covid 19's crisis saw a doctor's test)

पश्चिम बंगालमधील राजकीय नेते, फिजिशियन, स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. बिधनचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ भारतात राष्ट्रीय डॉक्टरदिन (Doctor's Day) दरवर्षी 1 जुलै रोजी भारतीय वैद्यकीय संघटनेकडून साजरा केला जातो. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचे शिखर आम्ही पार केलेले आहे. या अत्यंत कठीण काळात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी असाधारण सेवा दिलेली आहे. कोविड महामारीचा सामना करताना डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर कर्मचारी वर्गाला भरपूर परिश्रम घ्यावे लागले आहेत तसेच प्रचंड ताण पेलावा लागलेला आहे. यापैकी काहींना आपल्या कुटुंबातील सदस्यांना विषाणूंमुळे गमवावे लागले आहे, याकडे डॉ. बुवाजी यांनी लक्ष वेधले.

प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील आरोग्य निगा व्यवस्था आणि कोविड निगा केंद्रांमध्ये आपला जीव धोक्यात घालून या कठीण काळात ज्या डॉक्टरांनी आणि आरोग्य क्षेत्रातील इतर प्रोफेशनलनी सेवा दिलेली आहे त्या सर्वांना हे वर्षही वाहिलेले आहे. डॉक्टरांचा आदर करायला हवा तसेच त्यांना संरक्षण द्यायला हवे. या महामारीमुळे डॉक्टरांचे समाजातील योगदान किती महत्त्वाचे आहे याची लोकांना जाणीव झालेली आहे. एकदा पूर्ण ठीक होऊन इस्पितळातून बाहेर आलेला रुग्ण जेव्हा आरोग्यदायी स्थितीत सल्ला घेण्यासाठी पुन्हा येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या स्मितापेक्षा जास्त समाधान देणारे डाॅक्टरासाठी आणखी काही नसते, असे डाॅ. बुवाजी यांनी सांगितले.

Doctor's Day
वर्षाऋतूत स्त्रीचे 'आरोग्य रक्षण'

या महामारीशी झुंजण्याच्या बाबतीत लसीकरण हे अंतिम आणि निर्वाणीचे शस्त्र आहे. लोकांनी आपल्या मनातील लसीकरणाविषयी भीती दूर करावी आणि आपल्या तसेच इतरांच्या लसीकरणासाठी पाऊल पुढे टाकावे. लस न घेऊन आपण स्वतःला आणि कुटुंबाच्या सदस्यांनाही धोक्यात टाकतो याची जाणीव ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला.

डॉक्टरांकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन

डॉक्टरांनी पूर्ण बांधिलकी दाखवून कोरोना संकटाचा सामना केलेला आहे. अतिदक्षता विभागात गंभीर आजारी असलेल्या कोरोना रुग्णाला हाताळणे हे डॉक्टरांसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या ताण आणणारे असते. तरीही डॉक्टरांनी आपल्या परीने शक्य तितक्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देतानाच भावनिकदृष्ट्या त्यांच्यापासून स्वतःला वेगळे ठेवत व्यावसायिक पद्धतीने कामही केले असल्याचे आयएमए गोवा विभागाचे अध्यक्ष डॉ. विनायक बुवाजी यांनी सांगितले आहे.

महामारीच्या काळात शंभर टक्के योगदान

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवरून भरपूर टीका झालेली असली, तरी या महामारीच्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या परीने शंभर टक्के योगदान दिले आहे. आपल्या आरोग्यासाठी त्याचप्रमाणे आपली मुले व कुटुंबासाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते हे माहीत असूनही कोरोना रुग्णांवर उपचार करत आलेल्या गोमेकाॅतील तसेच आरोग्य खात्याच्या अन्य सर्व डाॅक्टरांचे आणि सर्व खासगी डॉक्टरांचे मी डॉक्टर दिनानिमित्त (Doctor's Day) अभिनंदन करतो. आरोग्य क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी हा कसोटीचा काळ राहिलेला आहे. रुग्णांना वाचविण्यासाठी अथक प्रयत्न केलेल्या परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनाही विसरून चालणार नाही अशा भावना डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com