काँग्रेसची गोव्यातील 'पक्षांतर' संपुष्टात आणण्याची प्रतिज्ञा

मागील पाच वर्षांतील पक्षांतरामुळे गोवा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Congress

Congress

Dainik Gomantak 

Published on
Updated on

गोवा विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. याकाळात अनेक पक्षाच्या नेत्यानी व आमदारांनी पक्षांतर केले आहे. हे सुरू असताना काँग्रेसने मात्र राज्याच्या राजकारणात सतत पक्षांतर करण्याची प्रथा बंद करण्याची जाहीर शपथ घेतली आहे.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
मतलबी आंदोलने आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधी

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे दोन महिने बाकी असताना, गोवा काँग्रेसने (Congress) राज्यातील जनतेला दिलेल्या व्यापक आश्वासनांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये “गोव्यातील पक्षांतर संपुष्टात आणण्याची” प्रतिज्ञा आहे. पक्षाने रविवारी आपल्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवर दिलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, "आम्ही पक्षांतर करणाऱ्यांना काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करू देणार नाही."

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका विद्यमान आमदाराने राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी हे वचन आले आहे. गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी सांगितले की, “पक्षांतर हे गोव्याच्या राजकारणाचा एक भाग आहे. मात्र, मतदारांनी तुम्हाला एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर निवडून दिलेले असताना, केवळ सत्तेसाठी पक्ष बदलणे योग्य नाही. त्यामुळे गोव्यात पहिल्यांदाच काँग्रेसने हा धाडसी निर्णय घेतला आहे." अनेक राज्यात निवडणुकांपूर्वी काही प्रमाणात पक्षांतर होते, मात्र गोव्यात पक्षांतराचे प्रमाण बाकीच्या राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथील मतदारसंघ लहान आहेत व गोव्यामध्ये राजकीय पक्षांपेक्षा नेत्यांचे वर्चस्व जास्त आहे.

मागील पाच वर्षांतील पक्षांतरामुळे गोवा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, 40 सदस्यांच्या सभागृहात 17 आमदारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र, भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) या गोव्यातील प्रादेशिक संघटनांशी युती करून सरकार स्थापन केले. हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. आजच्या तारखेला गोव्यात काँग्रेसचे फक्त दोन आमदार उरले आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणूक तोंडावर असताना गेल्या तीन महिन्यात नऊ आमदारांनी राजकीय पक्ष बदलले आहेत. यामध्ये मागील आठवड्यात भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये सामील झालेल्या वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेडा यांचा समावेश आहे.

आल्मेडा म्हणाले, त्यांनी राजीनामा दिला कारण माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हयात असतानाचा भाजप आता राहील नाही. दरम्यान, चोडणकर म्हणाले, "अल्मेडा यांचा काँग्रेसमधील प्रवेश इतर पक्षांतरांपेक्षा वेगळा आहे. ही निवडणूकीची वेळ आहे. विकासाच्या नावाखाली अनेक नेते केवळ सत्तेसाठी व स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी स्थलांतर करतात.” ते पुढे म्हणाले, “भाजपने केलेल्या कृत्यामुळे दुखावलेले अनेकजण आहेत. आमच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या नेत्यांना स्थलांतरित व्हायचे आहे. कार्लोस आल्मेडा हे पक्षांतर करत नाही आहेत. त्यांनी भाजपसोबतचा कार्यकाळ पूर्ण केला आहे आणि आता ते परत एकदा मतदारांना सामोरे जातील."

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
योजनांची पोकळ घोषणाबाजी नको...

काँग्रेस नेहमीच पक्षांतराचा बळी ठरला आहे

भूतकाळात काँग्रेसने किमान एकदा तरी पक्षांतर करणाऱ्यांच्या मदतीने सरकार पाडले आहे.
काँग्रेसने 1991 मध्ये एमजीपीच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार पाडले होते. यासाठी त्यांनी
रवी नाईक (Ravi Naik) आणि इतर सहा आमदारांना सामील करून घेतले होते व नाईक यांना मुख्यमंत्रीपद दिले होते. 1999 मध्ये, 40 सदस्यांच्या विधानसभेत 21 आमदारांच्या जोरावर सत्तेत आलेले लुईझीन फालेरो (Luizinho Faleiro) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाच महिन्यांतच पडले. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असलेले नेते फ्रान्सिस्को सार्डिन्हा (Francisco Sardinha) यांनी इतर 10 आमदारांसह काँग्रेसपासून फारकत घेतली, वेगळा पक्ष स्थापन केला आणि भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले.

सार्डिन्हा सरकार केवळ 11 महिने टिकले, कारण तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या नाईक यांच्यासह काँग्रेसचे नऊ सदस्य भाजपमध्ये सामील झाले. पर्रीकर मुख्यमंत्री असताना
नाईक यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले. सार्डिन्हा आणि नाईक अखेरीस काँग्रेसच्या गोटात परतले. 2017 मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आलेले नाईक यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. चोडणकर म्हणतात की काँग्रेस नेहमीच “गोव्यातील पक्षांतराचा बळी” झाला आहे.

2017 मध्ये, जेव्हा कॉंग्रेस 17 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, तेव्हाचे कॉंग्रेसचे आमदार विश्वजित राणे यांनी मतदानानंतर लगेचच राजीनामा दिला होता. ते मार्च मध्ये बाहेर पडले व पुढील महिन्यात भाजपमध्ये सामील झाले. अखेर पोटनिवडणुकीत ते भाजपचे आमदार म्हणून पुन्हा निवडून आले. पुढील चार वर्षांत, आणखी 12 आमदार भाजपमध्ये सामील झाले. लुईझीन फालेरो आणि आलेक्स रेजिनाल्ड (Aleixo Reginaldo) यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष निवडला. परिणामी काँग्रेसकडे फक्त 2 आमदार उरले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com