अभिनंदन! तुम्‍ही अन्‍यायाला वाचा फोडली

‘गोमन्तक’चे संपादक राजू नायक यांचे अभिनंदन. बांधकाम खात्‍यातील अभियंता भरती संदर्भात त्‍यांनी ज्या प्रकारे छातीठोकपणे नीलेश काब्राल यांच्‍या नावासकट बातमी प्रसिद्ध केली, ते कौतुकास्‍पद आहे.
Writing
Writing Dainik Gomantak
Published on
Updated on

नीना नाईक

बांधकाम खात्‍यातील अभियंता भरती प्रक्रियेमधील संशयास्‍पद कृतीला ‘गोमन्‍तक’ने वाचा फोडली. त्‍या वृत्तांकनाचे सामाजिकदृष्‍ट्या महत्त्‍व अधोरेखित करणारे चार शब्‍द...

‘गोमन्तक’चे संपादक राजू नायक यांचे अभिनंदन. बांधकाम खात्‍यातील अभियंता भरती संदर्भात त्‍यांनी ज्या प्रकारे छातीठोकपणे नीलेश काब्राल यांच्‍या नावासकट बातमी प्रसिद्ध केली, ते कौतुकास्‍पद आहे.

विषय गोपनीय होता, पण स्‍फोट अचूक वेळ साधून केला. बिचारे काब्राल अस्‍वस्‍थ झाले. त्‍यांनी मुळमुळीतपणे सारवासारव करायचा प्रयत्न केला. त्‍यांनी काही गोष्टी अधोरेखित केल्या- ‘मी रेपिस्ट नाही, माझ्यावर केसिस नाहीत’.

रागाच्या भरात मनात होतं ते ओठावर आले. परंतु कितीही झटकलं तरी धनुष्यातून बाण बाहेर पडला. त्यांच्या नाड्या कुठे आवळल्या देव जाणे; पण त्‍यांनी राजीनामा स्‍वेच्‍छेने दिला वा द्यायला लावला हे मात्र खरे.

बातमी सनसनाटी होती. कुणीतरी संपादकांना वृत्त सांगण्याची तसदी घेतली असणार. परंतु ती बातमी पडताळणे, शहानिशा करून बातमी छापण्‍याची जोखीम संपादकांनी घेतली. ‘उकराल माती तर पिकतील मोती’ हा बाणा आवडला. बातमी भडक न करता, नेमकेपणाने मुद्दे मांडत ‘गोमन्तक’ने स्टँडवर खपही वाढवला.

राजू नायक हे नुसते संपादक न राहता सामाजिक क्षेत्रातील जबाबदार व्‍यक्‍ती, समाजधुरीण असे बिरुद त्‍यांना कृतीतून लाभले आहे. असे अनेक राजकारणी आहेत जे कोर्टकचेरीच्या वाऱ्या नियमितपणे करत आहेत.

सध्या राज्‍याची परिस्थिती ‘अंधेरी नगरी, चौपट राजा’ अशी आहे. उदाहरणच द्यायचे तर बाणस्तारी खून. अघळ पघळ वेशीला ओघळ. असो. अरे ला का रे झालं तरी अखेर नारळाचा अहेर वाजंत्र्यांच्‍या गजरात नीलेश काब्राल यांना मिळाला.

आज राजकीय क्षेत्रात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. मीडियावर देवळातील भेटही दखलपात्र झाली आहे. राजकीय हेतू तसेच संघटना, चळवळ ह्यात भौतिक व आभासी अशी नवी संकल्पना उदयाला आली आहे.

नीलेश काब्राल यांच्‍याबाबत बातम्या पाहिले की वाटते, तंत्रज्ञान धोरणंच बदलावे लागेल. राजकारण म्‍हणजे पिल्लू सोडायचे आणि शब्दांचा खेळ करायचा. भलत्‍याच्‍याच खांद्यावरून बंदूक चालवायची. दबावगट कार्यरत ठेवायचा. हे डाव हेतुपुरस्सर वापरले जातात. सोशल मीडिया हा चळवळीचाच भाग असतो.

Writing
Goa Tourist : पर्यटन हंगामासाठी हडफडे सॅटर्डे नाईट मार्केट सजले! पर्यटकांची मोठी गर्दी

ते दुधारी अस्त्र आहे. नोकरभरतीविषयक वृत्तांकन ज्‍या तडफेने लावून धरले, त्‍यातून राजू नायक यांनी ताकद दाखवून दिलीय. पत्रकारितेद्वारे ‘गोवा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या मालकीचा’ही भूमिका दिसली. पुढील काळात निवडणुकींना उधाण येणार, सोशल मीडियावर चिखलकाला खेळला जाणार.

मीडिया टीम म्हणून गट स्थापले जाणार, फेसबूक, व्हॉट्सॲप ग्रुप, ट्विटर, इन्स्टाग्रामवर फैरी झाडणारी उत्तरे, प्रतिउत्तरे, व्यंगचित्र अशा तांत्रिक बाबी, माहितगारांची खोटारडी भरती होणार. मतदारांपर्यंत पोहोचण्याचे कार्य जोमात सुरू होणार.

प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी पडद्यामागचे कलाकार पाय घसरेपर्यंत कृतिशील बनतील. फेक आयडी करून व्यक्‍तिस्वातंत्र्य अबाधित ठेवून वार करतील, अशांना विनंती सामाजिक उपद्रव टाळा. कुणाचा तरी आदर्शबाळगा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com