Goa Politics| दिगंबर कामतांची खिल्ली उडवण्याची स्पर्धाच समाजमाध्यमांवर चालली आहे

प्रसाद घेतल्याशिवाय पाऊल उचललेले नाही, असेच बहुतेक मुख्यमंत्री आजवर गोव्याच्या नशिबी आले आहेत.
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

पयले छुटच सांगतो; देवाची थट्टा उडवण्याचा आमचा कोणताच इरादा नाही. आमची(ही) देवावर अपार श्रद्धा आहेच. राजकारण्यांच्या देवांना तर आम्ही जाम टरकतो. त्यातही गोव्यातील राजकारण्यांच्या देवांची आम्हाला प्रचंड भीती वाटते. कारण, हे देव त्या राजकारण्यांना पूर्णपणे वश असतात, याची आम्हाला खात्री आहे. ते देव त्यांच्याशी प्रसाद कौलाच्या माध्यमातून संपर्क साधतात, त्यांच्याशी चक्क बोलतात. प्रत्यक्ष देवच शिळोप्याच्या गप्पा मारायला आल्यावर राजकारणी किती बलाढ्य होतो, याची कल्पनाच केलेली बरी. तो मग काहीही करू शकतो, दिलेला शब्द फिरवू शकतो, घेतलेल्या शपथेची सुरनळी करून आपल्या आणि इतरांच्याही कानात घालू शकतो. होत्याचे नव्हते तर तो एरवीही करत असतो, पण देव प्रसन्न झाल्यावर नव्हत्याचे होतेही करतो.

(competition to make fun of Digambar Kamat is going on in social media)

Digambar Kamat
Bank Robbery : केरी बँक दरोडा प्रकरणातील तिघांना शिताफीने पकडले

देव- दैवतांचे हे राजकारणातले प्रस्थ आमची पाचावर धारण बसवते. तेव्हा त्यांची थट्टा वगैरे करण्याचा आमचा मानस नाही, आमच्यात ते धाडस नाही. गोव्याचे लोक देवभिरू आहेत, हे आम्ही जाणतो. सध्या दिगंबर कामतांची खिल्ली उडवण्याची स्पर्धाच समाजमाध्यमांवर चालली आहे. आम्ही तिचा निषेध करतो. देव ज्याचा त्याचा असतो, ज्याने त्याने तो आपापल्या मनाप्रमाणे घ्यावा, असे संतवचन आहे. दिगंबरांनी आपल्या अटीवर देवाला स्वीकारले असेल तर ते स्वातंत्र्य त्यांना आपल्या राज्यघटनेनेच दिले आहे. देवाचे प्रस्थ कुणाच्या जीवनात किती असावे हे काही घटना सांगत नाही.

एरवी कोणत्याही विषयांत दखलअंदाजी करणाऱ्या आपल्या न्यायालयांनीही देवाशी कुठल्या स्तरापर्यंत जाऊन करार-मदार करावेत, ते कधीच स्पष्ट केलेले नाही. ह्या संदिग्धतेचा लाभ कुणी दिगंबर कामत उठवत असतील तर त्यांना संशयाचा फायदा देणे हे देवभिरू या नात्याने गोमंतकियांचे कर्तव्य. कृपया कामत यांच्या ‘कंडिशनल’ देवनिष्ठेची टर उडवू नये. त्यांच्या अटी आणि शर्ती त्यांच्या देवाला मान्य आहेत की नाहीत, एवढ्यापुरताच तो विषय मर्यादित असावा. त्या मान्य असतील तर तो देव कामतांना हवा तसा कौल देईल. त्याने कामतांना वचनभंगासाठी कौल दिलेला असेल तर त्याला तुम्ही आम्ही हरकत घेऊ शकत नाही. कामतांचा देव तुमचे-आमचे अपिल स्वीकारणार नाही.

Digambar Kamat
‘दामोदर’साठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर; मडगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक

प्रसाद कौलालादेखील कुणाचीच हरकत असण्याचे कारण नाही. प्रसाद घेतल्याशिवाय पाऊल उचललेले नाही, असेच बहुतेक मुख्यमंत्री आजवर गोव्याच्या नशिबी आले आहेत. निवडणुकीला उभे राहाण्याआधी बहुतेक उमेदवार आपापल्या देवाचा प्रसाद घेतात. देवाने आपल्याला उजवी कळी दिल्याचा विश्वास सगळ्यांच्याच देहबोलीत असतो. प्रत्यक्षात यश मिळते ते अवघ्यांनाच. यात देवांचा दोष नाही. त्याच्या कौलाचा अन्वयार्थ लावणाऱ्यांचा तो दोष. खरे तर कौल प्रसादाच्या तंत्रात पारंगत असलेल्या व्यक्तींची गोवा सरकारने तमाम देवळांत नियुक्ती करायला हवी. त्यातून रोजगाराचा प्रश्न काही अंशी तरी निकालात निघेल. या तंत्राची सखोल जाण असलेले गावोगावी आहेत. त्यातल्या कुणीतरी देवाला दोन पायांचा कोंबडा आणि चार पायांचा बकरा न देता दहा पायांचा प्राणी कापण्याचा शब्द दिला आणि काम झाल्यावर खाडींतला खेकडा नेऊन कापला, ही सुरस कथा गोव्यात सर्वज्ञात आहे. प्रश्न ‘इंटरप्रिटेशन’चा आहे. कामत यांच्याकडे ते कौशल्य विपुल प्रमाणात असावे. त्यांना हवा तसा कौल देवांना दिला असेल किंवा त्याचे आपल्याला हवा तसा अर्थ त्यांनी लावला असेल. तुम्ही आम्ही शंकासुरासारखा आक्षेप घेतला तर कामत क्षमा करतील, पण त्यांचा देव करील, याची खात्री नाही. तेव्हा सावधगिरी बाळगावी.

कुणी देवाला भरीस घालून राजकीय पक्षांशी बदफैली केली तर त्यात वावगे ते काय? राजकीय पक्ष त्याच लायकीचे असतात. देवासमोर शपथा घेतल्या, प्रमाण झाले आणि नंतर विसरून गेले, अशा नेत्यांची भरभराट काय दर्शवते? पक्षाहून माणूस मोठा असतो, हा कानमंत्र त्यांना कदाचित त्यांच्या देवानेच दिला असेल. राजकारण्यांना देवही टरकून असावेत, अशी दाट शंका आम्हाला आहे. संत-महंत- स्वामी-महाराज तर त्यांच्या खाका-बगलात वावरतात. तुम्हा-आम्हाला नैतिकतेचे डोस पाजणाऱ्या कुणी स्वामी-बाबांनी एखाद्या पक्षबदलू नेत्याचा कान पिळल्याचे कधी ऐकलेय का? राजकारणांतली नैतिकता जेव्हा लयाला गेली तेव्हाच ह्या लोकांनीही आपली सत्यनिष्ठा कनवटीला लावली असावी. त्यांच्या मठांत नेत्यांचे पान मानाचे असते, पहिला आशीर्वाद नेत्याला मिळतो. हा एकविसाव्या शतकाचा नियम आहे, आपल्याला त्याच्याशी जळवून घ्यावे लागेल. चला, दिगंबरांचे अभिनंदन करू. त्यांनी श्रद्धेलाच दिगंबर केलेय ना..!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com