9 ऑगस्ट 1942 ला मध्यरात्रीपासून देशात आणि मुंबईत पोलिसांचे धाडी सत्र सुरु होते. यामध्ये गांधी, नेहरु, मौलाना आझाद (Gandhi, Nehru, Maulana Azad) यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधीना नेण्यात आले तर इतरांना नगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. पण त्याकाळी आपल्या देशावर ब्रिटीशांचे राज्य असणाऱ्या त्या सरकारला 9 ऑगस्टची इतकी धास्ती का होती. काय होणार होते, 9 ऑगस्टला?
या दिवशीच भारताने ब्रिटीशांविरोधात ‘भारत छोडो आंदोलन’ सुरु केले. (India started the 'Leave India Movement' against the British) महात्मा गांधीजींनी देशातील जनतेला ‘करो या मरो’ चा मंत्र दिला. आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करुयात, यासाठी आपल्याला बलिदान द्यावे लागले तरी चालेल. असा मंत्र गांधीजींनी मुंबईच्या गवलिया टँक मैदानावरुन दिला आणि भारताच्या स्वातंत्र्याला सुरुवात झाली. त्यामुळे हा दिवस ‘ऑगस्ट क्रांती दिन’ (‘August 9, Kranti divas’) म्हणून ओळखला जातो. या दिवसापासूनच भारतातील ब्रिटीशांच्या सत्तेला खऱ्या अर्थाने सुरुंग लागला आणि पुढे 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटाशांच्या तावडीतून दीडशे वर्षे गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी त्यावेळी सर्वच भारतीय आतुर होते. त्याचवेळी महात्मा गांधी यांनी करो या मरो ची ठिणगी पेटविल्यानंतर सर्वच भारतीयांमध्ये एक उत्साह संचारला, सर्व देश भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी एकवटून एक मोठे जनआंदोलन उभे राहिले यामुळे भारतात असलेली ब्रिटीश राजवट पूर्ती हदरुन गेली.
भारत छोडो अंदोलनाची खरी सुरुवात 1942 च्या आधीच झाली होती, परंतु या काळात झालेल्या दुसऱ्या महायुध्दामुळे या लढ्याला हवे तसे बळ मिळाले नाही. 1939 मध्ये दुसऱ्या महायुध्दमुळे जगाची दोन गटांमध्ये विभागणी झाली. अमेरिका, ब्रिटनच्या सोबत त्यांची मित्र राष्ट्रे तर जर्मनी, जपानसोबत अक्ष राष्ट्रे गेले. जपानने ब्रिटशसौन्याला आग्नेय आशियातून माघार घेण्यास भाग पाडले. त्यांनी सिंगापूर, मलाया आणि बर्मा म्हणजेच आजचे म्यानमार जिंकून त्यांनी भारतात प्रवेश केला. जपान भारतावर हल्ल्याच्या तयारीत होते. पण त्याचवेळी भारताने ब्रिटिशांन विरोधात रणशिंग फुंकले होते, त्यावेळी मित्र राष्ट्रांचा देखील भारताला पाठिंबा मिळाला आणि अमेरिका, फ्रान्स यांनी देखील ब्रिटवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यावेळचे भारतीय गर्व्हनर 3 सप्टेंबर 1939 साली भारतातील नेत्यांना डावलून भारत जर्मनी विरोधातील युध्दात सहभागी होणार असल्याची घोषणा केली.
या युध्दात काँग्रेमध्ये ब्रिटीशांना पाठिंबा देण्यावरुन मतभेद होते. पण यात ब्रिटीशांना भारताची साथ गरजेचीच होती. भारताने जर ब्रिटीशांना साथ दिली तर त्याबदल्यात भारताला काय मिळणार अशी भूमिका भारतातील त्या काळच्या नेत्यांनी घेतली. 1942 ला क्रिप्स मिशनने प्रस्ताव मांडला त्यात क्रिप्सने भारताला संपूर्ण स्वराज्य नाकारत डॉमिनियन स्टेटचा प्रस्ताव मांडला मात्र तो भारताकडून नाकारण्यात आला. दुसऱ्या महायुध्दाच्याकाळात ब्रिटीशांनी भारतीयांचा खूप छळ केला. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या, त्यांचे शोषण केले. त्यामुळे ब्रिटीशांबाबत भारतीयांच्या मनात असंतोष उफाळून आला. आणि अशातच भारत छोडो सुरु करण्यावर बरेच वाद झाले. परंतु अखेर गांधीजींनी हे आंदोलन सुरु करण्याचा 14 जुलै 1942 रोजी निर्धार झालेल्या बैठकीत केला. 1 ऑगस्ट 1942 टिळक दिवस अलाहाबादमध्ये साजरा झाल्यानंतर यावर चर्चा झाली आणि 8 ऑगस्ट 1942 ला मुंबईत भारत छोडोचा प्रस्ताव मान्य झाला आणि संपूर्ण स्वराज्याची मागणी झाली.
गंधीजींनी केलेली करो या मरो ची घोषणा भारताच्या जनतेच्या मनावर खोलवर रुजली भारतीयांमध्ये जोश, उत्साह, दृढनिश्चय, संकल्प आत्मविश्वास निर्माण झाला. 8 ऑगस्टला ऑगस्ट क्रांतीची घोषणा झाल्यावर 9 ऑगस्टच्या सकाळी सर्व प्रमुख नेत्यांना ब्रिटीश सरकारकडून अटक करण्यात आली.
याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, या आंदोलनात भारतीय महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता. 9 ऑगस्टच्या क्रांती दिनी मुंबईतील गवालिया टँक मैदानावर तिरंगा डौलाने फडकला. तेव्हापासून या मैदानाला आझाद मैदान हे नाव देण्यात आले. भारत छोडो अंदोलनाचे हदरे ब्रिटीशांना चांगले बसायला लागेल. आता स्वातंत्र्य मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही हा आत्मविश्वास भारतीयांमध्ये दृढ झाला. नंतर याची खात्री देखील ब्रिटीशांना झाली, आणि त्यांना सत्ता सोडावी लागली. परंतु या लढ्यात अनेक भारतीयांना आपल्या प्रणाची आहुती द्यावी लागली. मात्र त्यांनी केलेल्या बलिदानाचा आजही करोडो भारतीयांना विसर पडलेला नाही. जय हिंद !
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.