पंतप्रधान मोदी उज्ज्वला 2.0 योजनेचा करणार शुभारंभ; 1 कोटी कुटुंबांना थेट लाभ

2016 मध्ये उज्ज्वला 1.0 योजना मोदी सरकारने (Modi government) लॉंच केली होती. या योजनेतर्गंत तब्बल पाच कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

देशात कोरोनाचं सावट (Covid 19) काहीस ओसरत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मंगळवारी दुपारी 12.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) महोबा येथे एलपीजी कनेक्शनचे वितरण करुन उज्ज्वला 2.0 योजनेचा शुभारंभ करणार आहेत. सोबतच कार्यक्रमावेळी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसोबत चर्चाही करणार आहेत. 2016 मध्ये उज्ज्वला 1.0 योजना मोदी सरकारने लॉंच केली होती. या योजनेतर्गंत तब्बल पाच कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते.

Prime Minister Narendra Modi
देशात अमेरिकेसारखेच रस्ते करणार : नितीन गडकरी

यानंतर मोदी सरकारने योजनेचा विस्तार करत 2018 मध्ये सात आणि आठ श्रेणीमध्ये आठ कोटींचे लक्ष वाढविण्यात आले होते. मात्र हे लक्ष्य सात महिन्यांच्या आधीच ऑगस्ट 2019 सरकारने पूर्ण केले होते. 2021-22 या आर्थिक वर्षात पीएमयूवाय योजनेनुसार 1 कोटी वाढीव एलपीजी कनेक्शन देण्याची तरतूद करण्यात आली होती.

Prime Minister Narendra Modi
COVID-19: आता व्हॉट्सॲपवरूनच मिळवा लसीकरण प्रमाणपत्र

त्याचसोबतच एक कोटीचे लक्ष ठेवण्यात आले. ज्या नागरिकांना योजनेचे लाभ घेता आला त्यांना उज्ज्वला 2.0 मध्ये डिपॉझिट मोफत एलपीजी कनेक्शन सोबतच पहिली रिफिल आणि हॉटप्लेट फ्री देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासोबत उज्ज्वला 2.0 चा लाभ घेण्यासाठी नागरिकांना रेशन कार्ड जमा करावे लागणार आहे. पंतप्रधान उज्ज्वला 2.0 चा शुभारंभ करत असताना मोदी सरकारमधील केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com