COVID-19 Vaccination: देशात 7 महिन्यांत लसीकरण 50 कोटीच्या पार

देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.
भारतात (In India) 16 जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या कोविड -19 (Covid-19) लसीकरण मोहिमेने जवळपास 7 महिन्यांनी 50 कोटींचा टप्पा पार (Crossed the 50 crore mark in 7 months) केला आहे.
भारतात (In India) 16 जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या कोविड -19 (Covid-19) लसीकरण मोहिमेने जवळपास 7 महिन्यांनी 50 कोटींचा टप्पा पार (Crossed the 50 crore mark in 7 months) केला आहे.Dainik Gomantak

नवी दिल्ली: भारतात (In India) 16 जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या कोविड -19 (Covid-19) लसीकरण मोहिमेने जवळपास 7 महिन्यांनी 50 कोटींचा टप्पा पार (Crossed the 50 crore mark in 7 months) केला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, कोविड -19 लसीकरणाला देशात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. परंतु हळूहळू आकडे वाढतच गेले आणि आता देशातील 50 कोटी लोकांपैकी काहींचा लसीचा एक डोस आणि अनेकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे मोठे योगदान आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या देशात इतक्या लवकर असे सकारात्मक लसीकरण मोहीम प्रशंसनीय आहे.

लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू झाले

भारतात कोरोनाचे लसीकरण मोहीम हळूहळू अनेक टप्प्यांत सुरू करण्यात आली. जेणेकरून, अराजकता टाळता येईल कारण कोरोना विषाणू शत्रूसारखा आहे जो लपून हल्ला करतो. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाविरूद्धच्या लढाईत लसीकरण हे एकमेव शस्त्र म्हणून सांगितले आहे. परंतु या मोहिमेच्या सुरुवातीला लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरले होते. ते देखील हळूहळू कमी झाले आहेत.

भारतात (In India) 16 जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या कोविड -19 (Covid-19) लसीकरण मोहिमेने जवळपास 7 महिन्यांनी 50 कोटींचा टप्पा पार (Crossed the 50 crore mark in 7 months) केला आहे.
Covid19: चीनच्या लॅबमधूनच कोरोना लिक! US रिपब्लिकनचा अहवाल

पहिला टप्प्यात कोरोना वॉरियर्सना लसीकरण

लसीकरणाचा पहिला टप्पा भारतात या वर्षी 16 जानेवारीला सुरू झाला. पहिल्या टप्प्यात कोरोनाशी लढाईत आघाडीवर असलेल्या सुमारे तीन कोटी कोरोना वॉरियर्सना लसीकरण करण्यात आले. यामध्ये आरोग्य कर्मचारी, लष्करी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता. कोरोना वॉरियर्ससोबतच, 50 वर्षांवरील सुमारे 27 कोटी लोकांना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले. मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सुमारे 2,360 लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. ज्यात राज्य लसीकरण अधिकारी, कोल्ड चेन अधिकारी, आयईसी अधिकारी, विकास भागीदार इत्यादींचा सहभाग होता. आतापर्यंत 61,000 हून अधिक कार्यक्रम व्यवस्थापक, 2 लाख लसीकरण कर्ते आणि 3.7 लाख इतर लसीकरण संघ सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर दिले जात आहे.

भारतात (In India) 16 जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या कोविड -19 (Covid-19) लसीकरण मोहिमेने जवळपास 7 महिन्यांनी 50 कोटींचा टप्पा पार (Crossed the 50 crore mark in 7 months) केला आहे.
COVID-19 ची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही: केंद्रीय आरोग्य मंत्रालय

दुसरा टप्प्यात 60 ते 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण

देशात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर, दुसरा टप्पा 1 मार्च 2021 रोजी सुरू करण्यात आला. लसीकरण 2.0 मध्ये, 60 ते 45 वर्षांवरील लोकांना आणि काही गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्यांना लस देण्याची तरतूद करण्यात आली होती. या लसीकरण 2.0 ला सामान्य लोकांसाठी लसीकरणाचा परिचय म्हणूनही ओळखले जात असे. या टप्प्यात सरकारी रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा करण्यात आली होती. सुमारे दहा हजार सरकारी रुग्णालये आणि वीस हजार खाजगी रुग्णालयांचा यात समावेश करण्यात आला. लसीकरण 2.0 मध्ये, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लस दिली जात होती, तर खासगी रुग्णालयांमध्ये ही लस मोफत उपलब्ध नव्हती.

भारतात (In India) 16 जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या कोविड -19 (Covid-19) लसीकरण मोहिमेने जवळपास 7 महिन्यांनी 50 कोटींचा टप्पा पार (Crossed the 50 crore mark in 7 months) केला आहे.
Covid 19: भारतीयांसाठी ब्रिटेनमध्ये आता फक्त 'होम आयसोलेशन'

तिसरा टप्प्यात 18 ते 45 वर्षापर्यंतच्या लोकांना लसीकरण

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेबरोबर देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू देखील सुरु झाला. ज्यामध्ये 18 ते 45 वर्षापर्यंतच्या लोकांना लसीकरण करण्याची तरतूद करण्यात आली होती. यासाठी देशभरातील प्रशासन आणि सरकारकडून व्यवस्था करण्यात आली आणि अनेक मोठे बदलही करण्यात आले. त्याच वेळी, लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. तिसरा टप्पा सुरू झाल्यावर, थेट राज्य सरकार, खासगी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रे, लस निर्मिती कंपन्या यांच्याकडून लस खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली. उत्पादक कंपन्या आपला 50 टक्के स्टॉक केंद्र सरकारला देत होत्या आणि उर्वरित 50 टक्के भाग राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांचा होता.

भारतात (In India) 16 जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या कोविड -19 (Covid-19) लसीकरण मोहिमेने जवळपास 7 महिन्यांनी 50 कोटींचा टप्पा पार (Crossed the 50 crore mark in 7 months) केला आहे.
COVID-19 Vaccine: केंद्र सरकारने आतापर्यंत दिली 100 कोटी लसींची ऑर्डर

केंद्र सरकारचे लसीकरणावर नियंत्रण

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशात मोठ्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण दिसून आले, तसेच वाढती अराजकता पाहून केंद्र सरकारने देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेतून राज्यांचे नियंत्रण संपवले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका घोषणेनुसार 21 जून 2021 रोजी लसीकरण मोहीम केंद्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आणि राज्यांना लसींच्या मोफत पुरवठ्याविषयी बोलले गेले. पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेमध्ये 18 वर्षांवरील सर्व लोकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने, सध्या देशभरात लसीकरण मोहिमेअंतर्गत तीन लस वापरण्यासाठी उपलब्ध आहेत, ज्यात ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेन्काची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन आणि रशियाची स्पुटनिक व्ही.

पंतप्रधान, आरोग्यमंत्र्यांनी अभिनंदन केले

भारताने शुक्रवारी कोरोना महामारीविरोधातील युद्धात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. शुक्रवारपर्यंत देशातील 50 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com