Books on Wheels: शेवटच्या मिनिटाला गरज आठवणाऱ्यांसाठी- 'मेसर्स सरदेसाई एंटरप्राईजेस'

दुकानात असलेल्या साऱ्या चिजा तेथे उपलब्ध नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या निकडीच्या, गरजा भागवणाऱ्या स्टेशनरी वस्तू या व्हॅनमध्ये आहेत.
Books on Wheels
Books on WheelsDainik Gomantak

Books on Wheels मेसर्स सरदेसाई एंटरप्राईजेस या स्टेशनरी आणि पुस्तकांच्या दुकानात नम्रता सरदेसाई त्यांच्या नवऱ्याला मदत करतात. पणजीत जामा मस्जीदच्या समोर असलेले हे दुकान काही वर्षांपूर्वी अनेक शाळांना जवळ होते व त्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या सोईचेही होते.

शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळी हे दुकान उघडायचे. शेवटच्या मिनिटाला आपली गरज आठवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दुकान एक खात्रीशीर दिलासा होते.

पणजी शहरातील अनेक शाळा नंतर कुजीरा- बांबोळी येथे स्थलांतरित झाल्या. मात्र कुजिरासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गरज सकाळी-सकाळी भागवणारे स्टेशनरी दुकान नसल्यामुळे त्यांची अडचण व्हायची.

मग नम्रता यांना पालकांचे फोन वेळी-अवेळी यायचे. ही अडचण नित्याची बनली होती. काही प्रसंगी नम्रताने त्यांची नड भागविलीही. कुजिरा शाळा संकुलाच्या ठिकाणी एखादे स्टेशनरी दुकान टाकावे हा विचारही नम्रताच्या मनात आला.

पण समस्या ही होती की अशा एखाद्या दुकानासाठी तिथे जागाच नव्हती किंवा तशी व्यवस्थाही नव्हती. अशावेळी नम्रताच्या मनात मोबाईल (फिरत्या) स्टेशनरी दुकानाची कल्पना आली.

कुठलेही फिरते दुकान म्हटले की त्यासाठी वाहन असणे हे आलेच. नम्रताने असे वाहन घेण्यासाठी कर्ज मिळावे म्हणून ईडीसी(इकॉनॉमिक डेव्हलॉपमेंट कॉर्पोरेशन)कडे प्रस्ताव दिला. त्यावेळी फिरत्या वाहनातून व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी अनेकांचे तिथे अर्ज आले होते.

पण त्यातले जवळजवळ सारेच ‘फुड व्हॅन’साठी होते. ‘फिरती स्टेशनरी व्हॅन’ ही एक अभिनव कल्पना होती. ईडीसीच्या अधिकाऱ्यांना ती आवडली. त्यांनी नम्रताला  पूर्ण सहकार्य केले व तिच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली मान्यता दिली गेली.

Books on Wheels
सतर्क रहा! गोव्यात दोन दिवस ऑरेन्ज अलर्ट; पडझड, वाहतूक कोंडीसह राज्यात कुठे काय झाले?

नम्रताला तिच्या बालपणापासून उद्योगाचे बाळकडू  लाभले आहे. तिचे लहानपण मुंबईत गेले आहे. तिच्या वडिलांच्या जनरल स्टोअरवर ती त्यांना सहाय्य करायची. नम्रता म्हणते, ‘उद्योग व्यवस्थापनाचे धडे मी माझ्या वडिलांकडून मिळवले आहेत.

व्यवस्थापन शास्त्र शिकण्यासाठी मी कुठल्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला नाही. माझ्या वडिलांनी आपल्या ग्राहकांशी इतके चांगले नाते निर्माण केले होते की आमच्या दुकानातून सामान नेण्यासाठी दूर अंतरावरून देखील लोक यायचे.’

लग्न होऊन गोव्यात आल्यानंतर काही काळाने नम्रताने तिचे पती सिद्‍ध्ये सरदेसाई यांना त्यांच्या व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. फिरते स्टेशनरी दुकान ही कल्पना त्यांच्या त्या व्यवसायाचा एक प्रकारे छोटासा विस्तारच होता.

Books on Wheels
Panjim Smart City: पणजी तुंबल्याची ‘स्मार्ट झलक’

पणजीमध्ये असणाऱ्या त्यांच्या दुकानाची ती छोटी आवृत्ती ठरणार होती. अर्थात इथेही अनेकांनी या तिच्या कल्पनेच्या यशस्वीतेबाबत संशय व्यक्त केला. ‘लोक काय म्हणतील’ या प्रश्‍नाची कुजबूजही तिच्या कानापर्यंत आली.

‘एका महिलेला हा व्याप सांभाळला जाईल का?’ अशाप्रकारच्या प्रश्‍नांकडे नम्रताने दुर्लक्ष केले आणि आपले प्रयत्न जारी ठेवले. तिच्या नवऱ्याचे पाठबळ मात्र तिच्या पाठीशी भक्कमपणे होते.

Books on Wheels
Quepem Municipality: बाजार प्रकल्पातील दुकानांसंबंधी नगराध्यक्षांनी दिलीय 'ही' महत्वाची माहिती

2018 साली कुजीरा संकुलात शेवटी नम्रताचे फिरते स्टेशनरी दुकान सुरू झाले. आणि तिथल्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला.

अर्थात दुकानात असलेल्या साऱ्या चिजा तेथे उपलब्ध नसल्यातरी विद्यार्थ्यांच्या निकडीच्या गरजा भागवणाऱ्या बऱ्याच स्टेशनरी वस्तू या व्हॅनमध्ये आहेत. नम्रता सकाळी 6.30 वाजता आपले हे दुकान उघडते. शाळांची प्रार्थना सुरू झाली की दुकान बंद होते.

कुजिरा शिक्षण संकुलात सकाळच्या वेळेत पोहोचलात तर नम्रताच्या या ‘बुक्स ऑन व्हिल्स’ ला (हे तिने आपल्या त्या दुकानाला दिलेले  नाव आहे) अवश्‍य भेट द्या. कारण या दुकानामागे तिच्या कल्पकतेची आणि धडाडीची कहाणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com