तुम्ही तुमच्या म्हातारपणात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा. तुम्ही काही किंवा इतर बचत योजनेत वेळेवर गुंतवणूक केली पाहिजे, ज्याचे फायदे तुम्हाला रिटायरमेंटनंतरच मिळतात. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही अशी योजना आहे, ज्यामध्ये पेन्शनसोबतच लोकांना मॅच्युरिटीवर मोठी रक्कम मिळते. या योजनेअंतर्गत 18 ते 70 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक आपली गुंतवणूक करू शकतो.
एनपीएस योजना काय आहे
नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. एनपीएस हा एक प्रकारचा अंशदायी पेन्शन योजना आहे. एनपीएस मधील गुंतवणुकीवर, तुम्हाला रिटायरमेंटनंतर एकरकमी निधी मिळेल. एनपीएस योजनेत गुंतवणूक करणारे लोक आयकर (Income Tax) विभागाच्या कलम 80-CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपये आणि आयकर विभागाच्या कलम 80-C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची वजावट मिळवू शकतात. तुम्हाला या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही एनपीएस अकाउंट गुंतवणूक करू शकता. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन (Online) एनपीएस खाते उघडू शकता.
असे अकाउंट करा ओपन
तुमच्याकडे नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत टियर 1 आणि टियर 2 अशी दोन प्रकारची अकाउंट आहेत. पेन्शन अकाउंट टियर 1 अंतर्गत उघडली जातात, तर वॉलंटर सेविंग अकाउंट टियर 2 अंतर्गत उघडले जाते. टियर 1 अंतर्गत कोणीही अकाउंट उघडू शकते. तसेच, तेच अकाउंट टियर 2 अंतर्गत उघडले जाऊ शकते, ज्यामध्ये आधीपासूनच टियर 1 अकाउंट असावे.
फक्त एक अकाउंट करा ओपन
एनपीएस अंतर्गत कोणताही नागरिक फक्त 1 अकाउंट उघडू शकतो. एमपीएस अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही बँक किंवा कोणत्याही संस्थेची मदत घ्यावी. सरकारी वेबसाइटच्या मदतीने तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टिममध्येही गुंतवणूक करू शकता. अकाउंट उघडण्यापूर्वी, प्रथम तुम्हाला तुमचे PRAN अॅक्टिव करावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.