vivo x note launch
vivo x note launch Dainik Gomantak

मोठ्या डिस्प्लेसह येतोय विवो एक्स नोट, जाणून घ्या कधी होणार लॉन्च

सोशल मीडियावर फीचर्स लीक
Published on

आपला मोबाईल फोन सतत अधिकाधिक स्मार्ट होत आहे. कॉलिंग आणि कम्युनिकेशन व्यतिरिक्त स्मार्टफोन हे मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे. लोक आपला बराच वेळ मोबाईल फोनवर गेम खेळण्यात किंवा चित्रपट, खेळ किंवा कार्यक्रम पाहण्यात घालवतात. स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्याही यूजर्सची आवड लक्षात घेऊन त्यांचे डिव्हाईस सतत अपडेट करत असतात.

विवो अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज एक नवीन स्मार्टफोन (smartphone) देखील लॉन्च करणार आहे. विवोने चित्रपट पाहण्याची आवड असलेल्या वापरकर्त्यांसाठी मोठ्या डिस्प्लेसह स्मार्टफोन डिझाइन केला आहे. विवोने आपल्या नवीन फोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नसली तरी, विवो एक्स नोटच्या स्पेसिफिकेशन्सने ही माहिती ऑनलाईन लीक केली आहे. हा फोन मार्चच्या पहिल्या आठवड्यात लाँच होईल असे बोलले जात आहे.

vivo x note launch
विधानसभा निवडणुका संपताच तेलाच्या किमती 15 रुपयांनी वाढणार, कारण..

सोशल मीडियावर फीचर्स लीक झाले

सोशल मीडियावर (Social media) असे बोलले जात आहे की विवोचा नवीन फोन विवो एक्स नोट या नावाने चीनमध्ये लॉन्च केला जाईल. या फोनचे काही फीचर्स आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

असे सांगण्यात आले आहे की विवोचा नवीन फोन 5G ऑपरेटींग आहे आणि यात 80W फास्ट चार्जिंग साठी सपोर्ट आहे. या स्मार्टफोनचे वजन सुमारे 221 ग्रॅम असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com