EPF Interest Rate: खासगी क्षेत्रातील कर्माचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून पीएफ व्याज जाहीर

Employee Provident Fund Interest Rate: ईपीएफओच्या ७ कोटींहून अधिक अंशधारकांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात लवकरच वार्षिक व्याज जमा केले जाणार आहे
EPFO news
EPFO newsDainik Gomantak
Published on
Updated on

PF Interest Rate 2025: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या देशभरातील कोट्यवधी सदस्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के ठेवण्यास हिरवा झेंडा दाखवला असल्याने ईपीएफओच्या ७ कोटींहून अधिक अंशधारकांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात लवकरच वार्षिक व्याज जमा केले जाणार आहे.

काय आहे निर्णय?

ईपीएफओने २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या केंद्रीय न्यासी मंडळाच्या २३७ व्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि आता या निर्णयाला अर्थ मंत्रालयानेही मान्यता दिली आहे.

EPFO news
3 वर्षांनी धमाका! PF वर मिळणार भरघोस परतावा, EPFO ​​ने वाढवला व्याजदर

श्रम मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ईपीएफवर ८.२५ टक्के व्याजदर देण्यास सहमती दर्शवली असून, श्रम मंत्रालयाने गुरुवारी (२२ मे) ईपीएफओला या संदर्भात माहिती दिली आहे.

गेल्या वर्षीच्या बरोबरीचा दर

हा व्याजदर मागील आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्ये दिलेल्या व्याजदराच्या बरोबरीचा आहे. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी ईपीएफ सदस्यांना ८.२५ टक्के व्याज मिळणार आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता.

गेल्या काही वर्षांतील व्याजदरांची स्थिती

ईपीएफओने फेब्रुवारी २०२४ मध्ये २०२३-२४ साठी व्याजदर किंचित वाढवून ८.२५ टक्के केला होता, जो २०२२-२३ मध्ये ८.१५ टक्के होता. त्यापूर्वी मार्च २०२२ मध्ये २०२१-२२ साठी ईपीएफवरील व्याजदर चार दशकांपेक्षा अधिकच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ८.१ टक्के पर्यंत कमी करण्यात आला होता. तर २०२०-२१ मध्ये तो ८.५ टक्के होता. या निर्णयामुळे ७ कोटींहून अधिक ईपीएफ सदस्यांना त्यांच्या बचतीवर चांगला परतावा मिळणार असून, त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाला यामुळे अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com