बहुचर्चित Nothing Phone1 खरेदी करताय तर ही बातमी आपल्यासाठी आहे

अनेक वैशिष्ट्यांसह ग्राहकांच्यासेवेत; सोशल मीडियावर ही चर्चेत
Nothing Phone 1
Nothing Phone 1Dainik Gomantak

बहुचर्चित Nothing Phone1 भारतीय स्मार्टफोन बाजारात नुकताच लॉन्च होत आहे. याची लोकप्रियता ही अल्पावधीत वेगाने वाढते आहे. Nothing Phone1 या नावाने कंपनीने भारतात पहिल्यांदाच एक हटके स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या फोनच्या जबरदस्त डिझाइन आणि लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर ही या फोनची चांगलीच चर्चा होत आहे.

Nothing Phone 1
Career Vastu Tips: करियरमध्ये सक्सेस हवंय तर करा 'हे' 7 सोपे वास्तु उपाय

भारतीय बाजारपेठेत Nothing Phone1ची किंमत 32,999 रुपयांपासून सुरू होते, आणि ती 38,999 रुपयांपर्यंत जाऊन थांबते. हा स्मार्टफोन 21 जुलै रोजी फ्लिपकार्टवर विक्रीसाठी सज्ज झाला आहे. जर तुम्ही Nothing Phone1 खरेदी करण्याचा विचारात असाल तर याबद्दलची विस्तृत माहिती आपल्यासाठी

Nothing Phone1हा इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळा फोन आहे. कारण याचे फिचर्स हे OnePlus Nord 2T, Poco F4 5G, या सारख्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये ही दिसत नाही. स्मार्टफोनमध्ये मागील पॅनल सुमारे 900 LED आहेत जे कॉल किंवा मेसेज अथवा ईमेल अथवा नवीन सूचना आल्यावर सुरु होतात. तर मागच्या आणि पुढच्या बाजूला + अॅल्युमिनियम फ्रेम्सवर गोरिला ग्लास 5 सपोर्ट असल्यामुळे फोन हातातही मजबूत वाटतो.

Nothing Phone 1 लहान हात असलेल्या लोकांना एका हाताने वापरणे कठीण होऊ शकते. याचा रंग पांढरा आणि काळा या दोन शेडमध्ये उपलब्ध आहे. तसेच Nothing Phone 1मध्ये दोन मागील कॅमेरे आणि एकच समोरचा कॅमेरा आहे.

Nothing Phone 1
Astro Tips for Money: 'या' टिप्स फॉलो केल्यास पडेल पैशांचा पाऊस

Astro Tips for Money: 'या' टिप्स फॉलो केल्यास पडेल पैशांचा पाऊसमागील कॅमेरा उत्तम काम करतो. हे चांगल्या प्रकाशात चांगले तपशीलवार फोटो कॅप्चर करण्यास देखील चांगली ईमेज कॅप्चर करतो आणि रंग देखील अगदी अचूक दिसतात. परंतु ग्लिफ कॅमेरा मोड अशा परिस्थितीत एकूण कामगिरी सुधारतो. याच्या कॅमेरामधून जेव्हा तुम्ही झूम इन करता. तेंव्हा मॅक्रो फोटो देखील बऱ्यापैकी चांगले दिसतात आणि फ्रंट कॅमेरा ही खुप चांगली इमेज कॅप्चर करु शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com