Career Vastu Tips: करियरमध्ये सक्सेस हवंय तर करा 'हे' 7 सोपे वास्तु उपाय

7 सोपे वास्तु उपाय करून तुम्ही करियरमध्ये यश मिळवू शकता
Career Vastu Tips
Career Vastu TipsDainik Gomantak
Published on
Updated on

या नव्या युगात आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करत असतो, नवनवीन गोष्टी शिकत असतो. यात आपल्याला अनेक खडतर आव्हाने आणि स्पर्धा पार कराव्या लागतात. करियरच्या या खडतर प्रवासात अनेकांना मेहनत करूनही यश मिळत नाही. केवळ काही लोक त्यांच्या करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त करतात. प्रत्येकाला उच्च स्थान आणि यश हवे असते, पण ते काहीच लोकांना मिळते.

यश मिळवायचे असते. तर तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करून आणि काही सोपे वास्तु उपाय करून तुम्ही हे यश मिळवू शकता. या उपायांबद्दल जाणून घेऊया, जे करिअर आणि वाढीसाठी महत्त्वाचे आहेत.

करिअर वाढीसाठी वास्तु टिप्स

1. हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रातही केळीच्या रोपाला खूप महत्त्व दिले गेले आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्याजवळ केळीचे रोप लावल्यास करिअरमधील अडचणी दूर होतात. काम सहज आणि लवकर होते, मेहनतीला योग्य ते फळ मिळते. कोणत्याही प्रकारची कामे लवकर होतात.

2. जर तुम्ही घरातून लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर काम करत असाल तर आणि कामाच्या ठिकाणीही तोंड दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी हे योग्य ठिकाण आहे. असे केल्याने करिअरमध्ये यश लवकर प्राप्त होते.

Career Vastu Tips
Fengshui Tips: घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल ट्री ठेवल्यास मिळेल यश

3. जेव्हा तुम्ही कामाच्या ठिकाणी बसता तेव्हा पाय ओलांडून बसू नका.शास्त्रानुसार तो करिअरमध्ये तो अडथळा मानला जातो. कामाच्या ठिकाणी तुम्ही ज्या खुर्चीवर बसता त्या खुर्चीचा मागचा भाग म्हणजेच मानेचा मागचा भाग उंच असावा. करिअरच्या वाढीसाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

4. यशासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही घराच्या पूर्व दिशेला किंवा कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला धातूचा सिंह ठेवू शकता. सिंह हे धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते. पितळेपासून बनवलेला सिंह असेल तर उत्तम.

5. काम करताना तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. कामात यश आणि प्रगतीसाठी हे शुभ मानले जाते.

6. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुमच्यासाठी चांगली ऊर्जा एनर्जीही महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या टेबलावर क्वार्ट्ज क्रिस्टल ठेवू शकता.

7. तुम्ही कुठेही काम करता, तुमच्या खुर्चीच्या मागे भिंत असेल तर चांगले आहे, पण त्यामध्ये दरवाजा किंवा खिडकी नसावी.

Career Vastu Tips
Vastu Tips: घरात मातीचे भांडे ठेवल्याने कधीही भासणार नाही पैशाची कमतरता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com