Ambani Vs Adani: 'फ्युचर रिटेल' विकत घेण्यासाठी अंबानी, अदानी यांच्यात चुरस

कर्जबाजारी झालेल्या कंपनीला खरेदी करण्यासाठी इतर 13 कंपन्याही दावेदार
Ambani Vs Adani
Ambani Vs AdaniDainik Gomantak
Published on
Updated on

Ambani Vs Adani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. कर्जबाजारी झालेल्या फ्युचर रिटेल लिमिटेड या कंपनीला खरेदी करण्याच्या रेसमध्ये हे दोन्ही उद्योगपती आघाडीवर आहेत.

Ambani Vs Adani
PM Kisan: पीएम किसानच्या 13 व्या हप्त्यापूर्वी सरकारने केला मोठा बदल, लगेच पाहा

रॉयटर्सने याबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार अदानी एअरपोर्ट होल्डिंग आणि फ्लेमिंगो ग्रुप यांचे जॉईंट व्हेंचर असलेल्या मून रिटेल प्रा.लि., रिलायन्स रिटेल व्हेंचर्स यांच्यासह इतर 13 कंपन्यांनी फ्युचर रिटेल खरेदी करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सबमिट केले आहे. इतर कंपन्यांमध्ये शालीमार कॉर्पोरेशन लिमिटेड, नलवा स्टील अँड पावर, यूनाइटेड बायोटेक, डब्ल्यूएचस्मिथ ट्रॅवल, कॅपरी ग्लोबल होल्डिंग्स यांचाही समावेश आहे.

Ambani Vs Adani
Twitter User: ट्विटर ब्लू भारतात लॉन्च, यूजर्सला दर महिन्याला द्यावे लागतील एवढे पैसे...

सध्या फ्युचर रिटेल्सची दिवाळखोऱीची प्रक्रिया सुरू आहे. ऑगस्टमध्ये जवळपास 33 देणेकऱ्यांचे 210.6 अब्ज रूपये ही कंपनी द्यायची होती. यात प्रामुख्याने बँक ऑफ इंडिया आणइ स्टेट बँक ऑफ इंडिया यांचाही समावेश होता.

फ्युचर ग्रुपच्या फ्लॅगशिप रिटेल युनिट फ्युचर रिटेलसाठी EOI जमा करण्याची मुदत या महिन्याच्या सुरवातीलाच संपली होती. कधीकाळी ही कंपनी देशातील सर्वात मोठी रिटेलर कंपनी होती. पण कर्जाची परतफेड न करू शकल्याने बँकांनी या कंपनीची दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली.

फ्युचर रिटेलची 3.4 अब्ज डॉलरमध्ये आपली संपत्ती रिलायन्स इंडस्ट्रीजला विकण्याची इच्छा होती. तथापि, अमेझॉन कंपनीने कोर्टात आव्हान दिल्याने कंपनीला असे करता आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com