फेसबुक देतंय कमाईची संधी, 'ही' ऑफर होणार लाँच

कंटेंट क्रिएटर्स आता फेसबुकच्या माध्यमातून रील्स बनवून कमाई करू शकतील
facebook reels
facebook reelsDainik  Gomantak
Published on
Updated on

फेसबुक रील्सचे जागतिक लाँचिंग झाले आहे. फेसबुकवर रील्स म्हणजेच छोटे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. Facebook Reels या छोट्या व्हिडिओची संकल्पना जगभरातील सुमारे 150 देशांमध्ये आहे. हे अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. फेसबुक रील्स पहिल्यांदा 2020 मध्ये Tiktok सोबतच्या स्पर्धेत लाँच करण्यात आली होती.

फेसबुक रील निर्मात्यांना कमाई करण्याची संधी देईल. यासाठी फेसबुक लवकरच एक नवीन फीचर आणणार आहे. या अंतर्गत आता फेसबुक छोट्या व्हिडिओंमधून (video) कमाईचा काही भाग रील निर्मात्यांसोबत शेअर करण्याची तयारी करत आहे. येत्या काही आठवड्यांत फेसबुक प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करणार आहे. याचा अर्थ असा की कंटेंट क्रिएटर्स आता फेसबुकच्या माध्यमातून रील्स बनवून कमाई करू शकतील.

facebook reels
हुंदाईची जबरदस्त सवलत, ऑफरचा लाभ 28 फेब्रुवारीपर्यंतच

त्यामुळे फेसबुकने हा निर्णय घेतला

फेसबुकने हा निर्णय जगातील अनेक देशांमध्ये अधिकाधिक कंटेंट क्रिएटर्सना आपल्या प्लॅटफॉर्मवर आकर्षित करण्यासाठी टिकटॉकसमोर दिलेले आव्हान लक्षात घेऊन घेतला आहे.

लवकरच भारतात

फेसबुकने (facebook) सांगितले की ते प्रथम यूएस, कॅनडा आणि मेक्सिकोमधील रीलवर कमाई करणे सुरू करेल. पुढील काही आठवड्यांत ते आणखी देशांमध्ये लॉन्च केले जाईल. फेसबुकने सांगितले की ते लवकरच भारतात लॉन्च करण्याची योजना आखत आहेत, जी त्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

facebook reels
हुंदाईची जबरदस्त सवलत, ऑफरचा लाभ 28 फेब्रुवारीपर्यंतच

रिल्सवर जाहिरात येईल आणि कमाई होईल

वापरकर्ते कोणत्याही निर्बंधाशिवाय एकामागून एक रील पाहत राहतात आणि त्यांच्यामध्ये कोणतीही जाहिरात येत नाही. फेसबुकने आता यामध्ये नवा प्रयोग केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com