हुंदाईची जबरदस्त सवलत, ऑफरचा लाभ 28 फेब्रुवारीपर्यंतच

ऑफर डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही कारवर
Hyundai Discount Offer
Hyundai Discount OfferDainik Gomantak
Published on
Updated on

फेब्रुवारीच्या अखेरीस, हुंदाई इंडियाने आकर्षक सवलती देऊन त्यांच्या काही कारच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हुंदाई इंडिया i20, Aura, सँट्रो आणि Grand i10 Nios सारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर सूट देत आहे.

हुंदाई इंडियाने या कार्सवर Rs.50,000 पर्यंत सूट देत आहे. या ऑफरवर एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट आणि रोख सवलत देखील मिळू शकते. मात्र, या ऑफरचा लाभ 28 फेब्रुवारीपर्यंतच घेता येईल.

Hyundai Discount Offer
तुमचा क्रश तुम्हांला व्हॉट्सअ‍ॅपवर फॉलो करतोय, 'असं' ओळखा त्याला

हुंदाईच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कारपैकी एक असलेल्या सँट्रोला देखील नवीन आकर्षक ऑफर मिळत आहेत. हुंदाई Santro खरेदी करताना 40,000 रुपयांपर्यंतचा लाभ ग्राहकांना मिळत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही सूट केवळ 5-सीटर कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर दिली जात आहे. सँट्रोच्या सीएनजी मॉडेलवर कोणतीही सूट नाही.

हुंदाई आपल्या i10 Nios आणि Aura वर जास्तीत जास्त सूट देत आहे. ग्राहक नवीन Grand i10 Nios किंवा Aura घरी आणल्यावर रु.50,000 पर्यंत सूट मिळवू शकतात. ही ऑफर डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही गाड्यांवर लागू आहे, तर सीएनजी (CNG) च्या मॉडेलवर (model) कोणतीही सूट नाही.

Hyundai Discount Offer
तुमचा नवरा तुमच्यावर खरोखर प्रेम करतो? अस घ्या जाणून

दक्षिण कोरियाच्या ऑटोमेकरने आपल्या स्टायलिश हॅचबॅक, हुंदाई i20 साठी ऑफर देखील जाहीर केल्या आहेत. या महिन्यात कार खरेदी केल्यास 40,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. यामध्ये काही रोख सूट, कॉर्पोरेट ऑफर आणि एक्सचेंज बोनस देखील समाविष्ट आहेत. डिझेल असो वा पेट्रोल, कारच्या सर्व व्हेरियंटवर सवलत देण्यात आली आहे. सध्या या कारची सुरुवातीची किंमत 6.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com