Yamaha ची "E01" ई-स्कूटर झाली लॉन्च

यामाहा मोटरने "E01" नावाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात सादर केली आहे.
Yamaha E-scooter
Yamaha E-scooterDainik Gomantak
Published on
Updated on

यामाहा मोटरने "E01" नावाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात सादर केली आहे. जपानी कंपनीने असेही जाहीर केले की ते 5 आशियाई देशांमध्ये आणि युरोपमध्ये सेशन घेऊन लोकांना त्या संबंधीत माहिती दिली जाणार आहे. "E-01" ही एक इलेक्ट्रिक बाईक आहे जी मोटारबाईक तंत्रज्ञान आणि EV तंत्रज्ञानाची जोड आहे. "या बाईकचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते यामाहाने विकसित केलेल्या 125CC बाईकच्या बरोबरीचे EV वाहन असणार आहे. या मोटारसायकलमध्ये ताशी 100 किमी वेगाने धावण्याची क्षमता आहे, तर 60 किमी प्रति तास वेगाने 100 किमी अंतर कापण्याची क्षमता देखील आहे, " असे Takuya Maruo, Yamaha Motor म्हणाले आहे. (Yamaha Motor has introduced an electric scooter called E01)

Yamaha E-scooter
शेअर बाजारात घसरण, ग्रे मार्केटमध्ये LIC IPO चे प्रीमियम दर निम्म्यावर

इलेक्ट्रिक स्कूटर कमी अंतराच्या प्रवासासाठी उत्तम असल्याचे म्हटले जात आहे. इलेक्ट्रिक बाईकच्या ड्राइव्हमुळे मोटारसायकलला मागे टाकणे सोपे जाईल असं पत्रकाराने बाईकची ड्राइव्ह घेताणा प्रतिक्रीया दिली आणि इलेक्ट्रिक बाईकच्या कामगिरीने प्रभावित झाल्याचेही म्हटले आहे. "शाळेत जाणे तसेच खरेदीसाठी आणि इतर कामांसाठी ही बाईक खुप सोईस्कर पडत आहे. वेग कमी असतानाही ते सोपे आणि स्थिर आहे. मला ह्या इलेक्ट्रिक स्कूटरला चालवण्याचा खूप आनंद झाला आहे," मोटारसायकल पत्रकार तादाशी कोहनो यांनी या संबंधीत अशी प्रतिक्रीया दिली आहे.

त्याचा स्कूटरचा की-पॉइंट मुद्दा म्हणजे बॅटरी आणि चार्जिंगची सुविधा. ते एका तासात पूर्णपणे चार्ज होऊन जाते. बॅटरीचे कार्यप्रदर्शन हे त्याच्या तापमान आणि परिस्थितीवर पुर्णपणे आधारित असते. अशा प्रकारे बाजारपेठेमध्ये यासंबंधित प्रात्यक्षिक प्रयोग घेतले जाणार आहेत. यासाठीचे ठिकाण जपान, युरोप, उष्णकटिबंधीय तैवान, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया येथे आयोजित केले जाणार आहे.

"प्रदेश आणि ग्राहक ईव्ही वापरण्याच्या पद्धतीमधील तापमानातील फरक पाहता, आम्ही विविध डेटा मिळवू आणि पुढील विकासाचे ज्ञान मिळवण्यासाठी या प्रात्यक्षिक प्रयोगात त्यांचे विश्लेषण देखील करू असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. यामाहाच्या या कॉर्पोरेट मिशनसाठी, मी यामाहाच्या प्रसाराचा हेतू स्पष्ट करु इच्छितो. अलीकडच्या कार्बन न्यूट्रल वातावरणाची प्रकर्षाने जाणीव असताना, एक्झॉस्ट वायू प्रदूशन न करणाऱ्या ईलेक्ट्रीकल व्हेईकल, मला पर्यावरण आणि ग्राहकांच्या आनंदाचाही विचार करून एक नवीन मॉडेल विकसित करायचे आहे. या प्रात्यक्षिक प्रयोगाद्वारे, आम्ही सर्व मुद्दे पकडू इच्छितो.

Yamaha E-scooter
मर्सिडीज-बेंझ आता भारतात सुरू करणार EQS चे उत्पादन; जाणून घ्या

जे रायडर्सना आनंदी करतात आणि पुढील मॉडेल विकसित करण्यासाठी त्यांचा आण्ही उपयोग करणार आहोत," यामाहा मोटरचे टाकुया मारुओ म्हणाले आहेत. जे देश आम्ही ठरवले आहेत त्या देशांमध्ये सामायिकरण सेवा किंवा B ते B भाडे सेवा असणार आहे. प्रात्यक्षिक प्रयोगानंतर, यामाहा मोटरविविध देशांचा ड्रायव्हिंग डेटा प्राप्त करणार आहे. भविष्यात इलेक्ट्रिक स्कूटर आणि वाहनांच्या निर्मिती आणि विकासासाठी याचा विचार केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com