LIC च्या IPO साठी गुंतवणूकदारांचा उत्साह कमी होत आहे का? LIC IPO चा प्राइस बँड महाग आहे का? शेअर बाजारातील घसरणीचा LIC च्या IPO वर परिणाम होत आहे का? ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या शेअरचा प्रीमियम दर निम्म्यावर आल्याने हा प्रश्न निर्माण होत आहे. LIC IPO फक्त 42 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. तर दोन दिवसांपूर्वी ते 85 रुपयांच्या प्रीमियम किंमतीवर व्यवहार करत होते. (Premium rate reduced for LIC IPO in gray market)
एलआयसीचा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांच्या सबस्क्रिप्शनसाठी 4 ते 9 मे या कालावधीत खुला असेल. LIC IPO ची किंमत 902 रुपये ते 949 रुपये निश्चित करण्यात आली आहे. आणि आयपीओद्वारे 20,557 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.
IPO किमतीवर सूट
LIC आपल्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसीधारकांना सूट देत आहे. पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपये सवलत दिली जाईल, त्यानंतर किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 40 रुपये सूट मिळणार आहे.
तुम्हाला LIC च्या IPO मध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही LIC च्या IPO मध्ये शनिवार 7 मे आणि रविवार 8 मे रोजी देखील अर्ज करू शकता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने एक अधिसूचना जारी केली आहे की LIC च्या IPO साठी बिडिंग प्लॅटफॉर्म 4 मे ते 9 मे पर्यंत, शनिवार आणि रविवार, 7 आणि 8 मे या कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुले असेल. म्हणजेच, या आठवड्यात सुट्टीच्या दिवशी तुम्ही आरामात LIC च्या IPO मध्ये अर्ज करू शकता.
12 मे रोजी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाईल आणि 16 मे पर्यंत शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. एलआयसीचा आयपीओ 17 मे रोजी स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.