Xiaomi ग्लोबलचे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांचा राजीनामा, कंपनीने निवेदन केले जारी

Xiaomi: जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये राजीनाम्यांचं सत्र सुरु आहे. एक एक वरिष्ठ अधिकारी कंपनी सोडत आहेत.
Xiaomi Global Vice President Manu Kumar Jain
Xiaomi Global Vice President Manu Kumar JainDainik Gomantak
Published on
Updated on

Xiaomi: जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये राजीनाम्यांचं सत्र सुरु आहे. एक एक वरिष्ठ अधिकारी कंपनी सोडत आहेत. याच क्रमात, आता स्मार्टफोन ब्रँड Xiaomi चे ग्लोबल उपाध्यक्ष आणि भारतीय शाखेचे माजी प्रमुख मनु कुमार जैन यांनी राजीनामा दिला आहे. मनु जैन गेल्या 9 वर्षांपासून कंपनीशी निगडित होते. 2014 मध्ये भारतीय मोबाइल बाजारात Xiaomi लाँच करण्यात मनु जैन यांची महत्त्वाची भूमिका होती.

मनु कुमार जैन यांचा राजीनामा

आपल्या राजीनाम्यावर मनु कुमार जैन (Xiaomi Global Vice President Manu Kumar Jain) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "जीवनात परिवर्तन हीच एक एकमात्र स्थिरता आहे! गेल्या 9 वर्षांमध्ये, मला खूप प्रेम मिळाले. त्यामुळे निरोप घेणे कठीण होत आहे. तुम्हा सर्वांचे आभार."

Xiaomi Global Vice President Manu Kumar Jain
Xiaomi च्या अधिकाऱ्यांना करावा लागला 'शारीरिक हिंसाचाराचा' सामना, ED वर आरोप

तसेच, कंपनीने फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA) चे कथित उल्लंघन केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालय आणि Xiaomi यांच्यात सुरु असलेल्या कायदेशीर लढाईच्या दरम्यान त्यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणाबाबत कंपनीच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत, तर याच दरम्यान मनु जैन यांच्या राजीनाम्याने (Resignation) कंपनी आणखी अडचणीत येऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com