Xiaomi च्या अधिकाऱ्यांना करावा लागला 'शारीरिक हिंसाचाराचा' सामना, ED वर आरोप

चिनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात 4 मे रोजी न्यायालयात (Court) तक्रार दाखल केली आहे.
Xiaomi
Xiaomi Dainik Gomantak
Published on
Updated on

आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इडीने केलेल्या त्यांच्या चौकशीदरम्यान शारीरिक हिंसाचार, जबरदस्ती आणि धमक्यांचा सामना करावा लागला, असा आरोप चिनी स्मार्टफोन कंपनी असणाऱ्या Xiaomi Corp ने केला आहे.

Xiaomi
Xiaomi Super Sale : स्मार्टफोन, टीव्ही आणि लॅपटॉपवर बंपर सूट

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, चिनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात 4 मे रोजी न्यायालयात (Court) तक्रार दाखल केली आहे. रॉयटर्सने दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, न्यायालयात सादर केलेल्या दस्तऐवजात असे म्हटले आहे की, अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी Xiaomi कॉर्पचे भारतातील माजी व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन, सध्याचे मुख्य आर्थिक अधिकारी समीर बीएस राव आणि त्यांच्या कुटुंबियांना "गंभीर परिणामांना" सामोरे जाण्याची चेतावणी दिली आहे.

Xiaomi
''तेलंगणात मुख्यमंत्री नाही तर 'राजा' आहे,'' राहुल गांधींचा हल्लाबोल

दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

तसेच, Xiaomi फेब्रुवारीपासून तपास यंत्रणांच्या रडारावर आहे. गेल्या आठवड्यातच, भारतीय एजन्सीने कंपनीच्या भारतीय बँक खात्यांमध्ये असलेले $72.5 दशलक्ष जप्त केले होते. त्यानंतर एजन्सीने म्हटले होते की, कंपनीने "रॉयल्टीच्या नावाखाली" बेकायदेशीर परदेशी देयके दिली आहेत.

दुसरीकडे, Xiaomi ने तपास यंत्रणांचे आरोप फेटाळून लावले आहेत. Xiaomi ने म्हटलयं की, 'आमची सगळी रॉयल्टी देयके कायदेशीर आहेत. त्यामध्ये आम्ही कोणतेही चुकीचे काम केले नाही.' तथापि, गुरुवारी Xiaomi च्या वकिलांच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने मालमत्ता गोठवण्याच्या तपास संस्थेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 मे रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com