जागतिक पुस्तक दिनामिनित्त वाचू शकता स्टॉक ट्रेडिंग पुस्तकं

युनेस्कोने 1995 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता
World Book Day
World Book DayDainik Gomantak
Published on
Updated on

World Book Day 2022: दरवर्षी 23 एप्रिल हा जगभरात 'जागतिक पुस्तक दिन' म्हणून साजरा केला जातो. आज म्हणजेच 23 एप्रिलला पुन्हा एकदा 'जागतिक पुस्तक दिन' साजरा होत आहे. यावर्षी 25 वा जागतिक पुस्तक दिन साजरा केला जाणार आहे. युनेस्कोने 1995 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता आणि तेव्हापासून हा दिवस साजरा केला जात आहे. (World Book Day)

लोकांमध्ये पुस्तकांची आवड निर्माण व्हावी ही पुस्तक दिवस साजरा करण्यामागची संकल्पना आहे. काळाच्या ओघात आजकाल बहुतांश तरुण आणि मुले तंत्रज्ञानाकडे वळली आहेत. तर पुस्तके हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे हे विसरले आहे. मात्र पुस्तकं काय करू शकते हे कोरोना काळात बऱ्याच जणांना कळलं आहे. कोरोनाच्या काळात झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींनी खुलासा केला होता की, विविध प्रकारची पुस्तके वाचल्याने त्यांना गोष्टींकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टीकोन मिळाला. एक सकारात्मकता मिळाली.

World Book Day
केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! DA दरवाढीला लागू शकतो ब्रेक; कारण जाणून घ्या

23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यामागील एक कारण म्हणजे या दिवशी अनेक दिग्गज लेखकांचा जन्म झाला आणि काही महान लेखकांनीही या दिवशी अखेरचा श्वास घेतला. मॅन्युएल मेजिया व्हॅलेजो आणि मॉरिस ड्रोन यांचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला, तर विल्यम शेक्सपियर, मिगुएल डी सर्व्हंटेस आणि जोसेप प्लाया यांचा 23 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

लोकांना पुस्तकांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न

याशिवाय, या दिवशी युनेस्को आणि त्याच्या इतर संलग्न संस्था आगामी वर्षासाठी 'वर्ल्ड बुक कॅपिटल' ही थीम आहे. पुढील एक वर्ष पुस्तकांशी संबंधित कार्यक्रम आयोजित करणे हा त्याचा उद्देश आहे. वाचकांना आगामी नवीन पुस्तकांची जाणीव करून देण्यासाठी त्यांचा अधिकाधिक पुस्तकांकडे कल वाढवण्याचा प्रयत्न आहे.

साजरा करण्याचा वेगळा मार्ग

जागतिक पुस्तक दिन प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. कुठेतरी पुस्तके मोफत वाटली जातात आणि लोकांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातात. जगभरात लोकप्रिय असलेल्या स्पेनमध्ये दोन दिवस वाचन मॅरेथॉन चालवली जाते.

World Book Day
लवकरच खाद्यतेल महागणार! इंडोनेशियाने तेलाच्या निर्यातीवर घातली बंदी

स्टॉक ट्रेडिंग जाणून घेण्यासाठी तुम्ही ही पुस्तके वाचू शकता

  • The Little Book of Common Sense Investing by Jack Bogle


    A Random Walk Down Wall Street by Burton G. Malkiel


  • The Intelligent Investor by Benjamin Graham


  • One Up On Wall Street by Peter Lynch


  • The Warren Buffett Way by Robert G. Hagstrom


  • How to Make Money in Stocks by William J. O’Neil


  • Stocks to Riches by Parag Parikh


  • How To Avoid Loss and Earn Consistently by Prasenjit Paul

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com