Wipro founder Azim Premji gave 1 crore shares worth Rs 480 crore to his children:
विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी आपल्या मुलांना कंपनीचे सुमारे 1 कोटी शेअर्स भेट दिले आहेत. या शेअर्सची बाजारातील किंमत 500 कोटी रुपये आहे. अझीम प्रेमजी यांनी त्यांची दोन मुले ऋषद प्रेमजी आणि तारिक प्रेमजी यांना ही भेट दिली आहे.
स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. हे गिफ्ट केलेले शेअर्स विप्रोच्या भाग भांडवलाच्या 0.20 टक्के आहेत. एक्सचेंज फाइलिंगनुसार, अझीम प्रेमजी यांनी त्यांचा मुलगा ऋषद प्रेमजी यांना विप्रोचे 51,15,090 इक्विटी शेअर्स भेट दिले आहेत. तारिक प्रेमजी यांनाही तेवढेच शेअर्स भेट देण्यात आले आहेत.
ऋषद प्रेमजी सध्या विप्रोचे अध्यक्ष आहेत. तर, तारिक प्रेमजी हे विप्रो एंटरप्रायझेसचे वरिष्ठ कार्यकारी संचालक आहेत.
या व्यवहारामुळे कंपनीच्या एकूण प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाच्या शेअरहोल्डिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
या व्यवहारानंतर अझीम प्रेमजी यांचा विप्रोमधील स्टेक 4.3 टक्क्यांवर आला आहे. त्याच वेळी, ऋषद प्रेमजी आणि तारिक प्रेमजी यांचा हिस्सा 0.13 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
विप्रोमध्ये प्रेमजी कुटुंबातील सदस्यांची एकूण भागीदारी ४.४३ टक्के आहे. यामध्ये अझीम प्रेमजी यांच्या पत्नी यास्मिन प्रेमजी यांच्या 0.05 टक्के स्टेकचाही समावेश आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत, विप्रोमधील एकूण प्रवर्तकांचा हिस्सा 72.90 टक्के होता.
विप्रोचा शेअर बुधवारी 478 रुपयांवर बंद झाला. गुरुवारी दुपारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 0.69 टक्क्यांनी घसरून 474.70 रुपयांवर व्यवहार करत आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 2,48,185.23 कोटी रुपये आहे.
विप्रो शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 526.45 रुपये आहे. ही पातळी 15 जानेवारीला पोहोचली होती. त्याच वेळी, त्याची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 17 एप्रिल 2023 रोजी 351.85 रुपये होती.
विप्रो ही संगणक-सॉफ्टवेअर आणि सल्लागार उद्योगातील एक कंपनी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.