Ashutosh Masgaunde
देशांतर्गत शेअर बाजारात सातत्याने वाढ सुरू आहे. शेअर बाजार बुधवारी नव्या उच्चांकावर बंद झाला.
सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठला असून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 357.59 अंकांनी उसळी घेऊन 69653.73 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82.6 अंकांच्या वाढीसह 20.937.70 या नवीन उच्चांकावर बंद झाला.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाले.
इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी 50 ने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढ वाढवली.
रविवारी जाहीर झालेल्या 4 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात मोठी उसळी निर्माण झाली आहे.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर राजकीय स्थिरतेच्या अपेक्षेमुळे आणि मजबूत वाढीचा दृष्टीकोन यामुळे पुढील कालावधीतही बाजारातील तेजीत राहण्याची शक्यता आहे.