Income Tax department: आयकर विभागाने का एलआयसीला ठोठावला 84 कोटींचा दंड?

Income Tax department: एलआयसी न्यायालयात मागणार दाद .
Income Tax department
Income Tax departmentDainik Gomantak
Published on
Updated on

Income Tax department: आयकर विभागाने देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (LIC) वर 84 रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयकर विभागाने एलआयसीला तीन वर्षांच्या मूल्यांकनासाठी हा दंड ठोठावला आहे.

Income Tax department
Airbnb च्या ग्राहकांची गोव्याला पसंती, पर्यटनावर खर्च केले 1400 कोटी रुपये

एलआयसीने आता आयकर विभागाने ठोठावलेल्या दंडाविरुद्ध अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. LIC ला कोणत्या शुल्कावर दंड ठोठावण्यात आला ते जाणून घ्या. वाचा काय आहे संपूर्ण बातमी.

आयकर विभागाने आज देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) वर कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयकर विभागाने एलआयसीकडून तीन मूल्यांकन वर्षांशी संबंधित 84 कोटी रुपयांच्या दंडाची मागणी केली आहे. आयकर विभागाच्या या दंडाविरोधात एलआयसीने आता कोर्टात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

Income Tax department
Natural Treatment for PCOS: आता औषधांशिवाय PCOS पासून मुक्त व्हा

आयकर विभागाने एलआयसीकडून तीन मूल्यांकन वर्षांशी संबंधित 84 कोटी रुपयांच्या दंडाची मागणी केली आहे. आयकर विभागाच्या या दंडाविरोधात एलआयसीने आता कोर्टात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

दंड का ठोठावला?

एलआयसीने सांगितले की कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. आयकर कायदा, 1961 च्या कलम 271(1)(C) आणि 270A अंतर्गत दंड आकारण्यात आला आहे, असे एलआयसीने म्हटले आहे. एलआयसीला ही नोटीस आयकर विभागाकडून 29 `सप्टेंबरला मिळाली होती.

LIC ला कोणत्या वर्षी किती दंड आकारण्यात आला?

आयकर विभागाने मूल्यांकन वर्ष 2012-13 साठी 12.61 कोटी रुपये, मूल्यांकन वर्ष 2018-19 साठी 33.82 कोटी रुपये, तर मूल्यांकन वर्ष 2019-20 साठी 37.58 कोटी रुपये दंड ठोठावला आहे, असे एलआयसीने आज एका नियामक फाइलिंगमध्ये सांगितले.

LIC जाणून घ्या

LIC हे भारतातील सर्वात मोठे सरकारी मालकीचे जीवन विमा आणि गुंतवणूक महामंडळ म्हणून ओळखले जाते. हे 1956 मध्ये 5 कोटी रुपयांच्या प्रारंभिक भांडवलासह सुरू झाले होते आणि आता 31 मार्च 2023 पर्यंत, LIC कडे 40.81 लाख कोटी रुपयांच्या जीवन निधीसह 45.50 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

शेअर आज लाल रंगात बंद झाला

व्यापार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, आज एनएसईवर एलआयसीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. आज LIC 4.75 पैशांनी घसरून 645.00 रुपयांवर बंद झाला. आज सेन्सेक्स 316 अंकांनी तर निफ्टी 109 अंकांनी घसरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com