Indian Railways News: रेल्वेच्या 'या' घोषणेने प्रवाशांचे बल्ले-बल्ले, जाणून घ्या पटकन

India Largest Train: भारताने आपले रेल्वे नेटवर्क इतके विशाल केले आहे की, सध्या तो जगातील चौथ्या क्रमांकाचा रेल्वे नेटवर्क असलेला देश बनला आहे.
Vivek Express Train
Vivek Express TrainDainik Gomantak

Vivek Express Train: ट्रेनमध्ये प्रवास करणे अधिक किफायतशीर आणि सुरक्षिततेने परिपूर्ण आहे. तुमच्या वैयक्तिक वाहनांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला जेवढा खर्च करावा लागतो त्यापेक्षा कमी खर्चात तुम्ही ट्रेनने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. भारताने आपले रेल्वे नेटवर्क इतके विशाल केले आहे की, सध्या तो जगातील चौथ्या क्रमांकाचा रेल्वे नेटवर्क असलेला देश बनला आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेने (Indian Railways) वंदे भारत सारख्या अनेक गाड्या सुरु केल्या आहेत, ज्यात प्रवास केल्याने वेळ वाचतो. सामान्य गाड्यांपेक्षा वेगाने धावणाऱ्या या गाड्यांमध्ये तुम्हाला अधिक सुविधा मिळतात. भारतीय रेल्वेने दिब्रुगढ ते कन्याकुमारी या भारतातील (India) सर्वात लांब ट्रेन विवेक एक्सप्रेसच्या वेळेत मोठा बदल केला आहे, जो प्रवाशांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

Vivek Express Train
Indian Railways: रेल्वेचा मोठा निर्णय, आता जनरल तिकीटाने करता येणार स्लीपरमध्ये प्रवास !

विवेक एक्सप्रेस बद्दल नवीन अपडेट

विवेक एक्स्प्रेस पूर्वी दिब्रुगढ ते कन्याकुमारी अशी दोन दिवस शनिवार आणि रविवारी धावत होती, पण आता तिच्या वेळेत बदल करुन ती 4 दिवस चालवण्याची योजना आहे. 27 मे 2023 पासून विवेक एक्सप्रेस दर शनिवार, रविवार, मंगळवार आणि गुरुवारी दिब्रुगढ ते कन्याकुमारी धावेल. 11 मे 2023 पासून ही ट्रेन कन्याकुमारी ते दिब्रुगड पर्यंत दर बुधवार, गुरुवार, शनिवार आणि सोमवारी धावेल.

तसेच, या ट्रेनमध्ये 22 डबे आहेत, ज्यात एक एसी टू टायर, 4 एसी थ्री टायर, 11 स्लीपर क्लास आणि 1 पॅन्ट्री कार आहे. याशिवाय, 2 पॉवर कम लगेज आणि 3 जनरल आसनव्यवस्था आहे

Vivek Express Train
Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, ऐकून तुम्हीही म्हणाल...

रेल्वेचा इतिहास काय आहे?

विवेक एक्सप्रेस, ज्याला भारतातील सर्वात लांब ट्रेनचा दर्जा मिळाला आहे, ती देशातील 9 राज्यांमधून जाते, ज्यामध्ये ती सुमारे 4189 किलोमीटरचे अंतर कापते. सर्वात लांब अंतर कापणाऱ्या या ट्रेनला 59 थांबे आहेत. विवेक एक्सप्रेस 19 नोव्हेंबर 2011 रोजी सुरु झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com