Indian Railways: ट्रेनमध्ये आता WhatsApp द्वारे Order करु शकाल तुमच्या आवडीचे जेवण

Indian Railways: ट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे...
Indian Railway
Indian RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Railways: ट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे.. परंतु आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे, कारण आता ट्रेनमध्ये तुम्हाला WhatsApp नंबरवर मेसेज करुन तुमच्या आवडीचे जेवण तुमच्या सीटवर मिळेल. IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने यात्रेकरुंना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे यात्रेकरुंना फक्त PNR नंबर वापरुन प्रवासात सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.

दरम्यान, आता तुम्ही कोणतेही अतिरिक्त अ‍ॅप्स डाउनलोड न करता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोणत्याही स्टेशनवर जेवण ऑर्डर करण्यासाठी Zoop वापरु शकता. व्हॉट्सअ‍ॅपवरील (WhatsApp) चॅट यूजर्स रिअल-टाइम फूड ट्रॅकिंग देखील करु शकतात. तसेच फीडबॅक देऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्या ऑर्डरशी संबंधित सहाय्य मिळवू शकतील.

Indian Railway
Indian Railway: जन्माष्टमीला शेकडो गाड्या रद्द, तुमची ट्रेन तपासा

दुसरीकडे, ही सुविधा सुरु झाल्यानंतर यूजर्संना यापुढे ट्रेनमध्ये (Train) प्रवास करताना रेल्वे पॅंट्री किंवा इतर विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. आता भारतीय रेल्वेमध्ये तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे जेवण कसे ऑर्डर करु शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

रेल्वे प्रवासी अशाप्रकारे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खाद्यपदार्थ बुक करतात

स्टेप 1: तुम्ही WhatsApp वर जाऊन झूप चॅटबॉट नंबर +91 7042062070 वर टेक्स्ट मेसेज पाठवू शकता. गोष्टी सुलभ करण्यासाठी तुम्ही हा नंबर सेव्ह करु शकता आणि जाता जाता जेव्हा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तेव्हा त्याच्याशी चॅट करु शकता. तसेच Zoop सोबत चॅट सुरु करण्यासाठी तुम्ही [https://wa.me/917042062070] नेव्हिगेट करु शकता.

स्टेप 2: तुमच्या फोनवर WhatsApp ओपन करा आणि फक्त 'हाय' टाइप करुन Zoop क्रमांक +91 7042062070 वर पाठवा.

स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला Zoop कडून एक रिप्लाय मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला फूड ऑर्डर करायचे आहे का, पीएनआर स्टेटस तपासा, ऑर्डर ट्रॅक करा असे विचारले जाईल. तुम्हाला अनेक पर्याय मिळतील.

स्टेप 4: जर तुम्हाला फूड ऑर्डर करायचे असेल तर तुम्हाला Order a Food या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप 5: त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक द्यावा लागेल.

Indian Railway
Indian Railway Rules: कन्फर्म सीट, बेबी बर्थ, इंश्योरन्स… ट्रेनमध्ये प्रवास करतांना या सुविधा उपलब्ध

स्टेप 6: यानंतर तुम्हाला पीएनआर आणि इतर तपशीलांची पुष्टी करण्यास सांगितले जाईल.

स्टेप 7: एकदा तुम्ही सर्व तपशील अचूक असल्याची पुष्टी केल्यावर, तुम्हाला तुमचे Food जिथे पोहोचवायचे आहे ते स्टेशन निवडण्यास सांगितले जाईल.

स्टेप 8: स्टेशन निवडल्यानंतर, तुम्हाला ते रेस्टॉरंट निवडावे लागेल, ज्यामधून तुम्हाला तुमचे जेवण ऑर्डर करायचे आहे.

स्टेप 9: मग तुम्हाला खाण्याची इच्छा असलेली डिश निवडा.

स्टेप 10: एकदा तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ऑर्डरचा तपशील मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पुढे जावे लागेल.

तुम्ही UPI, Netbanking इत्यादी सेवांद्वारे पेमेंट करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com