हवामान, दुरुस्तीची कामे आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे भारतीय रेल्वेला (Indian Railway) दररोज मोठ्या संख्येने गाड्या रद्द कराव्या लागत आहेत. गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आज म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी सणाच्या दिवशीही रेल्वेने देशभरातील 157 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. (Indian Railway Hundreds of trains canceled on Janmashtami check your train)
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, खराब हवामान आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत एवढेच नाही तर भारतीय रेल्वेने 5 ट्रेनचे वेळापत्रक बदलले आहे आणि 12 ट्रेन देखील वळवल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या 157 गाड्यांपैकी 37 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. तर त्याचवेळी 120 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
स्थिती कशी जाणून घ्यावी
भारतीय रेल्वेच्या बहुतांश सेवा आता ऑनलाइन उपलब्ध होतात. त्यामुळे, जर तुम्हालाही ट्रेनने प्रवास करायचा असेल, तर घर सोडण्यापूर्वी तुम्हाला ट्रेनची स्थिती जाणून घेणे फार आवश्यक आहे आणि स्थिती जाणून घेण्याची सुविधाही रेल्वेने ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वे रद्द झालेल्या गाड्यांची यादी भारतीय रेल्वे आणि IRCTC च्या वेबसाइटवर देत असते.
याशिवाय त्याची माहिती NTES अॅपवरही उपलब्ध आहे तर रेल्वे वेबसाइट https://enquiry.indianrail.gov.in/mntes वरील कोणत्याही ट्रेनची स्थिती किंवा IRCTC वेबसाइटशी लिंक https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 भेट देऊन घेता येते. भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवरून ट्रेनची स्थिती कशी जाणून घ्यावी हे सांगत आहोत.
ट्रेन रद्द झाल्यास रिफंड उपलब्ध आहे
ज्या प्रवाशांनी IRCTC वेबसाइटवरून ई-तिकीट बुक केले आहेत त्यांना तिकिटाच्या परतावासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाहीये. ट्रेन रद्द झाल्यास, परतावा ग्राहकाच्या बँक खात्यात/क्रेडिट कार्ड/ई-वॉलेटमध्ये जमा केला जाईल ज्या खात्यातून पेमेंट केले गेले आहे.
जर तुम्ही आरक्षण काउंटरवरून तिकीट खरेदी केले असेल, तर ते कोणत्याही संगणकीकृत आरक्षण काउंटरवर ट्रेन सुटल्यानंतर 72 तासांपर्यंत रद्द केले जाऊ शकते आणि जर प्रवाशाने स्वतःहून तिकीट रद्द केले, तर IRCTC काही रद्दीकरण शुल्क परतावामधून कापून घेते. प्रत्येक आरक्षण श्रेणीसाठी रद्द करण्याचे शुल्क वेगवेगळे असतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.