
WhatsApp News: व्हॉट्सअॅपकडे कोट्यवधी सक्रिय यूजर्स आहेत. कंपनी यूजर्सच्या गोपनीयतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी नेहमीच अलर्ट मोडवर असते. जर तुम्हीही हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप वापरत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे कारण कंपनीने अलीकडेच इस्रायली स्पायवेअर फर्म पॅरागॉन सोल्युशनवर काही पत्रकार आणि इतरांना हॅक केल्याचा आरोप केला आहे. व्हॉट्सअॅपने म्हटले की, या कंपनीचे ग्रेफाइट नावाचे स्पायवेअर लोकांना लक्ष्य करत आहे.
द गार्डियनच्या एका अहवालातून ही माहिती अलीकडेच समोर आली आहे. या अहवालात असे सांगण्यात आले की, ग्रेफाइट स्पायवेअरद्वारे केवळ काही पत्रकारांनाच नव्हे तर नागरी समाजातील सदस्यांनाही लक्ष्य करण्यात आले. जरी सर्व स्पायवेअर धोकादायक असतात, परंतु हे स्पायवेअर तुम्हाला कसे लक्ष्य करु शकते? ते जाणून घेऊया...
तुमच्या माहितीशिवाय आणि तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक न करता तुमच्या डिव्हाइसवर ग्रेफाइट स्पायवेअर इन्स्टॉल केले जाते. या डिव्हाइसला 'झिरो क्लिक अटॅक' म्हणतात. डिव्हाइसवर इन्स्टॉल केल्यानंतर हे स्पायवेअर तुमच्या सिस्टमचे नियंत्रण घेते. त्यानंतर हॅकर्स तुमच्या सिस्टममध्ये एन्ट्री करतात आणि तुमचा खाजगी डेटा चोरतात.
दरम्यान, ज्यांना लक्ष्य केले गेले त्यांचे लोकेशन माहित नाही, परंतु व्हॉट्सअॅपने लक्ष्यित वापरकर्त्यांना सूचित केले आहे. व्हॉट्सअॅपने पॅरागॉन कंपनीला काम बंद करण्याची नोटीस पाठवली. एवढचं नाहीतर व्हॉट्सअॅप पॅरागॉन कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे मार्ग देखील शोधत आहे. अशा स्पायवेअरपासून वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी व्हॉट्सअॅप आता त्यांच्या अॅपची सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने काम करत आहे.
पॅरागॉन आपले सॉफ्टवेअर सरकारांना देखील विकते, कंपनीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांचे 35 सरकारी ग्राहक आहेत, जे सगळे लोकशाही देश आहेत. सध्या व्हॉट्सअॅपला (WhatsApp) या हल्ल्यामागे कोण आहे हे शोधता आलेले नाही. दुसरीकडे, पॅरागॉनकडूनही या प्रकरणात अद्याप कोणत्याही स्वरुपाची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.