भाजपचे नेते जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीसमोर क्रिप्टो एक्सचेंज, ब्लॉक चेन आणि क्रिप्टो अॅसेट्स कौन्सिल (BACC), उद्योग संस्था यांनी क्रिप्टोकरन्सी बाबत आपली मते मांडली. अर्थविषयक संसदीय स्थायी समितीने बोलावलेली या विषयावरील ही पहिलीच बैठक होती. क्रिप्टो फायनान्सच्या गुंतवणुकीच्या संभाव्यतेबद्दल आणि जोखमींबद्दल विविध पक्षांकडून स्वारस्य आणि चिंता अलीकडच्या काळात वेगाने वाढल्या आहेत. संसदीय समिती IIM अहमदाबादच्या (Ahmedabad) शिक्षणतज्ञांकडूनही याबाबतच्या मार्गदर्शन सूचना जारी करण्यात येणार आहेत.
नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय बैठक
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मंत्रालये आणि RBI च्या अधिकार्यांसह क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency) मुद्द्यावर एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान केल्यामुळे सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीला महत्त्व आले.
समितीचे अध्यक्ष आणि माजी अर्थ राज्यमंत्री (Finance Minister) सिन्हा यांनी या बैठकीबद्दल सांगितले की, वेगाने वाढणाऱ्या उद्योगामुळे क्रिप्टो फायनान्सशी (finance) संबंधित संधी आणि आव्हाने यावर नियामक आणि धोरणकर्ते चर्चा करतील.
क्रिप्टो फायनान्सवरील तज्ञांशी चर्चा
जयंत सिन्हा म्हणाले, आम्ही मोठ्या एक्स्चेंजचे संचालक, CII चे सदस्य तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), अहमदाबाद मधील शिक्षणतज्ञांसह संपूर्ण उद्योगातील भागधारकांना आमंत्रित केले आहे, ज्यांनी क्रिप्टो फायनान्सवर खूप सखोल अभ्यास केला आहे. पुढे समितीने इंडिया इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींनाही बोलावले आहे.
क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन घोटाळा उघड
कर्नाटकातून उघडकीस आलेल्या कथित बिटकॉइन घोटाळ्याने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. हे प्रकरण आता इतके वाढले आहे की देशातील सत्ताधारी पक्ष भाजप (BJP) आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस (congress) आमनेसामने आले आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री (CM) बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना स्पष्टीकरण द्यावे लागले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला यावरून या प्रकरणाचे गांभीर्य समजू शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.