350 चिनी अ‍ॅप्सनंतर भारतात VLC मीडिया प्लेयर बॅन, जाणून घ्या कारण

आता तुम्ही व्हीएलसी मीडिया प्लेयर वापरू शकणार नाही.
video player software
video player softwareDainik Gomantak
Published on
Updated on

आता तुम्ही व्हीएलसी मीडिया प्लेयर (vlc media player) वापरू शकणार नाही. व्हिडिओ प्लेयर सॉफ्टवेअर (video player software) आणि स्ट्रीमिंग मीडिया सर्व्हर VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारतात VLC मीडिया प्लेयरवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यावर पूर्णपणे बंदी नाही म्हणजेच जर तुम्ही हे सॉफ्टवेअर आधीच डिव्हाइसवर स्थापित केले असेल, तर ते कार्य करत राहील आणि बंदीबाबत कंपनी किंवा सरकारकडून कोणतीही माहिती अध्याप आलेली नाही. (VLC media player banned in India)

video player software
India Export : जुलैमध्ये देशाची निर्यात वाढली, व्यापारी तूटही विक्रमी पातळीवर

चीनमुळे बंदी?

मोदी सरकारने यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव देशातील सुमारे 350 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती आणि अलीकडे, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) देखील Google Play Store आणि Apple च्या App Store वरून काढून टाकण्यात आले आहे. चायनीज कनेक्शनमुळे (Chinese Connection) व्हीएलसी मीडिया प्लेयरवरती बंदी (ban on VLC media player) घालण्यात आली आहे.

या प्लॅटफॉर्मचा वापर चीनी हॅकिंग ग्रुप सिकाडोने (Chinese hacking group Cicado) सायबर हल्ल्यासाठी केला होता तर काही महिन्यांपूर्वी, सुरक्षा तज्ञांना असे आढळून आले की, Cicado संशयित मालवेअर लोडरचा (malware loader) प्रसार करण्यासाठी VLC Media Player वापरण्यात येत आहे. तसेच हा गट मोठा सायबर हल्ला (cyber attack) करण्यासाठी मालवेअर पसरवत आहे. रिपोर्ट्सनुसार, ही सॉफ्ट बॅन आहे आणि या कारणास्तव सरकार किंवा अॅपकडून कोणतीही अधिकृत माहिती अध्याप देण्यात आलेली नाही.

वेबसाइट उघडत नाही किंवा डाउनलोड होत नाही

VLC मीडिया प्लेयर आणि VideoLAN प्रोजेक्टच्या व्हिएलसी (VLC ) मीडिया प्लेयर आणि वेबसाइटवर आयटी कायदा, 2000 अंतर्गत सरकारने बंदी घातली आहे तसेच VLC मीडिया प्लेयर आणि त्याची वेबसाईट (Website) दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. मात्र, कंपनीकडून अध्याप याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. परंतु, त्याची वेबसाइट डाउन आहे आणि डाउनलोड लिंक देखील ब्लॉक (Block) करण्यात आली आहे तसेच व्हीएलसी मीडियाची वेबसाईट ओपन केल्यावर आय अ‍ॅक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज दिसून येतो आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com