Vistara airline: विस्तारा एअरलाइनने आजपासून सुरू होणाऱ्या विशेष 48 तास सेलची घोषणा केली आहे. विस्तारा एअरलाइन ही टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड (Vistara Airline Flight Offer) आणि SIAचा संयुक्त उपक्रम आहे.
खाजगी विमान कंपनी विस्तारा आपला 7 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने विमान कंपनीने अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर विशेष भाडे जाहीर केले आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचे (Air travel) भाडे इकॉनॉमी क्लाससाठी 977 रुपयांपासून 2677 रुपयांपर्यंत सुरू होते. प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस क्लाससाठी हे भाडे 9777 रुपये आहे. कंपनीने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन भाडेही जाहीर केले आहे.
पहा नवीन रेटची यादी
नवीन रेटनुसार तुम्ही दिल्ली ते ढाका 13,880 रुपयांमध्ये प्रवास करू शकता. प्रीमियम इकॉनॉमी क्लाससाठी मुंबई ते मालदीवचे रेट 19,711 रुपये ठेवण्यात आले आहे. मुंबई-सिंगापूर बिझनेस क्लासचे रेट 47,981 रुपये निश्चित करण्यात आले आहे. विस्ताराची ही 7व्या अॅनिव्हर्सरी निमित्तची ऑफर या वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत 2022 पर्यंत प्रवाशांसाठी असणार आहे.
एअरलाइन कंपनीने (Airline company) ट्विटमध्ये म्हटले आहे की 7 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी विस्तारासोबत बुकिंग करताना विशेष ऑफरचा आनंद घ्या. #AirlineIndiaTrusts सह तुमच्या भविष्यातील प्रवासाची योजना करा.
विस्तारा नुसार, जम्मू-श्रीनगर (Jammu-Srinagar) मार्गावर 977 रुपये भाडे लागू आहे. याशिवाय बंगळुरू-हैदराबादचे भाडे 1781 रुपये, दिल्ली-पाटणा भाडे 1,977 रुपये, बंगळुरू-दिल्ली भाडे 3,970 रुपये, मुंबई-दिल्ली भाडे 2,112 रुपये आणि दिल्ली-गुवाहाटीचे भाडे 2,780 रुपये ठेवण्यात आले आहे.
या ऑफरच्या तिकिटांचा लाभ घेण्यासाठी विस्ताराची वेबसाइट www.airvistara.com ला भेट द्यावी लागेल, iOS आणि Android मोबाइल अॅप्सवर, विस्ताराच्या विमानतळ तिकीट कार्यालये, कॉल सेंटर्स, ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे या तिकिटांचे बुकींग केले जाऊ शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.