GDP: ओमिक्रॉन लहरींचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

50 टक्के क्षमतेने कार्यरत कारखाने, कंपन्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, जिम इत्यादींचा आर्थिक वर्ष 2021-22च्या चौथ्या तिमाहीत जीडीपीच्या वाढीच्या दरावर परिणाम होईल, असे तज्ञांचे म्हणने आहे.
GDP

GDP

Dainik Gomantak

नवीन वर्षाच्या आनंदावर ओमिक्रॉनची गडद छाया पडली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारने कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.

या निर्बंधांमुळे हळुहळू पण सुधारणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या जखमा पुन्हा हिरवीगार होण्याची शक्यता आहे. 50 टक्के क्षमतेने कार्यरत कारखाने, कंपन्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, जिम इत्यादींचा आर्थिक वर्ष 2021-22च्या चौथ्या तिमाहीत जीडीपीच्या (GDP) वाढीच्या दरावर परिणाम होईल, असे तज्ञांचे म्हणने आहे.

<div class="paragraphs"><p>GDP</p></div>
सॅमसंगचा हा मिनी फ्रीस्टाइल प्रोजेक्टर भिंतीवर दाखवणार नेटफ्लिक्स

कोरोनाच्या (Corona) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत टूर अँड ट्रॅव्हल्स, टुरिझम, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांसारखी संपर्क-केंद्रित क्षेत्रे मोठ्या कष्टाने पुन्हा आपल्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करत होत्या. आतातिसऱ्या लाटेने त्यांचे खांदे आणखी झुकवले आहेत.

सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) देशाच्या आर्थिक प्रगतीची माहिती देते. वर्षभरात त्याची कामगिरी कशी झाली आणि कोणत्या विषयात ती मजबूत किंवा कमकुवत आहे. त्याचप्रमाणे, जीडीपी आर्थिक क्रियाकलापांची पातळी दर्शविते आणि कोणत्या क्षेत्रांमुळे ती वाढली किंवा घसरली हे दर्शविते.

एचडीएफसी (HDFC) बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ अभिक बरुआ म्हणतात की, कोरोनाची तिसरी लाट जागतिक पुनर्प्राप्तीचा वेग कमी करेल. राज्यांमध्ये लादण्यात आलेल्या निर्बंधांचा परिणाम देशाच्या निर्यातीवर होणार आहे.

अशा स्थितीत, जानेवारी-मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 20 ते 30 बेसिस पॉइंट्सने घसरण्याची अपेक्षा आहे. HDFC ने आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीसाठी GDP वाढीचा अंदाज 6.1 टक्के ठेवला आहे. जे आता कमी होऊ शकते.

<div class="paragraphs"><p>GDP</p></div>
LIC च्या जीवन लाभ पॉलिसीसह तुमचे भविष्य करा सुरक्षित

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) 7 जानेवारी रोजी आर्थिक वर्ष 2021-22 साठी GDP साठी पहिले अंदाज जारी करेल. आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 8.4% च्या वेगाने वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com