Vi चे चार नवीन प्लॅन, 155 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉल

Vi सह रिलायन्स जिओ आणि एअरटेलने अलीकडेच किंमत वाढीची घोषणा केली आहे.
Vi introduced four new plans, unlimited calls will be available for Rs 155

Vi introduced four new plans, unlimited calls will be available for Rs 155

Dainik Gomantak

Published on
Updated on

Vi सह रिलायन्स जिओ आणि एअरटेलने अलीकडेच किंमत वाढीची घोषणा केली आहे, परंतु आता Vi (Vodafone) ने काही नवीन योजना जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये सर्वात स्वस्त प्लॅन 155 रुपये आहे, जो वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉल आणि 24 दिवसांची वैधता देतो. तसेच, जर वापरकर्ते एकाच वेळी दोन सिम चालवत असतील तर त्यांच्यासाठी ही एक योजना खूप उपयुक्त ठरू शकते. 155 रुपये, 239 रुपये, 666 रुपये, 699 रुपयांचे नवीन रिचार्ज () प्लॅन सादर केले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

Vi चा 155 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vi 155 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएस ऑफर करते. तसेच, या प्लानमध्ये यूजर्सना 1 GB इंटरनेट डेटा मिळतो. हा प्लॅन फक्त कॉलिंग युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.

<div class="paragraphs"><p>Vi introduced four new plans, unlimited calls will be available for Rs 155</p></div>
भारताच्या परकीय चलनामध्ये घट...

Vi चा 239 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Vi देखील 239 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या प्लॅन अंतर्गत यूजर्सला 155 रुपयांच्या प्लानप्रमाणे 24 दिवसांची वैधता मिळते. तसेच, या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 1 GB इंटरनेट डेटा मिळतो. यामध्ये यूजर्सना रोज 100 एसएमएस देखील मिळतात.

Vi Rs 666 प्रीपेड प्लॅन

Vi च्या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये 666 रुपयांचा प्लॅन देखील आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना 77 दिवसांची वैधता मिळते आणि हा एक खास प्लान आहे, ज्यांना दीर्घकालीन रिचार्ज करायचे आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 1.5 GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. याशिवाय Binge All Night, Data Delight Offer, Weekend Data Rollover सुविधाही उपलब्ध आहे.

Vi चा Rs 699 प्रीपेड प्लॅन

Vi चा 699 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे, ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना दररोज 3 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 SMS दररोज मिळतात. या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता 56 दिवसांची आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये डेटा रोलओव्हर, बिन्ज ओव्हरनाइट, डेटा डिलाईट ऑफर आणि Vi Movies आणि TV वर मोफत प्रवेश यांचा समावेश आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला, Vi ने अलीकडे हंगामा म्युझिकसोबत भागीदारीची घोषणा केली, ज्याच्या मदतीने प्रीपेड आणि पोस्टपेड वापरकर्त्यांना सहा महिन्यांसाठी हंगामा प्रीमियमची सदस्यता मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com